Karantaka Election 2023 esakal
देश

Karnataka Election : भाजपला धक्क्यावर धक्के; तिकीट नाकारल्यामुळं नाराज मंत्र्यानं घेतला मोठा निर्णय

भारतीय जनता पक्षानं कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.

Balkrishna Madhale

Karnataka Election 2023 : भारतीय जनता पक्षानं कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत 23 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.

यापूर्वी 189 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. आता फक्त 12 उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे. आपल्या दुसऱ्या यादीतही भाजपनं पक्षाचे विद्यमान आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री अंगारा एस (Angara S) यांना तिकीट दिलेलं नाही.

तिकीट न दिल्यामुळं नाराज झालेले अंगारा म्हणाले, माझ्या प्रामाणिकपणाचा मला फटका बसला आहे. आता मी राजकारणात राहणार नाही. निवडणूक प्रचारातही असणार नाही. पक्ष आता आपल्या नवीन उमेदवारांची काळजी घेऊ शकतो, असं सांगत त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत दिले आहेत.

भाजपनं अवघ्या 24 तासांत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात अनेक विद्यमान आमदारांकडं दुर्लक्ष करण्यात आलं आहे. पक्षानं 7 विद्यमान आमदारांना तिकीट नाकारलं असून यात चन्नागिरीचे आमदार मदल वीरुपक्ष यांचा समावेश आहे. ते सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत.

याशिवाय, भाजपनं खासदार कुमारस्वामी यांनाही तिकीट नाकारलं आहे. सीएम निंबण्णावर, एसए रवींद्रनाथ, नेहरू ओलेकर, एन लिंगाणा, सुकुमार शेट्टी या आमदारांनाही पक्षानं तिकीट दिलेलं नाही. यासह पक्षानं एकूण 18 विद्यमान आमदारांना तिकीट नाकारलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यरात्री ट्रकला धडकल्यानंतर पेटली बस, ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू; २२ जण जखमी

Vijaya Mehta : रंगभूमीचा दीपस्तंभ निमाला! ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

Taliban Airstrike Pakistan : पाकिस्तानमध्ये घुसून तालिबानकडून हवाई हल्ला?; अनेक दहशतवादी मारल्याचा अफगाणकडून दावा, सीमावाद उफाळला

Low Calorie Ragi Thalipeeth: डाजबिटीज फ्रेंडली! कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबरने भरपूर नाचणीचं थालीपीठ; जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT