देश

पूरपरिस्थितीची बैठक सुरू असताना झोपले कर्नाटकचे मंत्री; काँग्रेसने म्हटले...

सध्याच्या परिस्थितीला आधीचे काँग्रेस सरकारच जबाबदार

सकाळ डिजिटल टीम

Karnataka Flood Situation Meeting News बेंगळुरू : कर्नाटकात मुसळधार पावसामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्याचवेळी राजधानी बंगळुरूची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. येथील लोकांना ये-जा करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करावा लागत आहे. या भीषण संकटावर बैठक सुरू (Flood Situation Meeting) असताना मंत्री आर अशोक झोपेचा आनंद घेत होते. यामुळे भाजप आणि काँग्रेसमधील (Congress) आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र झाल्या आहेत.

काँग्रेसने (Congress) शेअर केलेल्या दोन फोटोंमध्ये मंत्री आर अशोक मुख्यमंत्र्यांच्या शेजारी खुर्चीवर बसलेले आहेत आणि डोळे बंद आहेत. ते झोपले आहे असे दिसते. मात्र, याची पुष्टी झालेली नाही. फोटो शेअर करताना काँग्रेसने कन्नडमध्ये लिहिले की, ‘बुडणे अनेक प्रकारचे असते. राज्यातील जनता पावसात बुडत आहे आणि मंत्री झोपेत बुडत आहेत.’

सध्याच्या परिस्थितीला आधीचे काँग्रेस सरकारच जबाबदार असल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटले आहे. असा प्रकार ९० वर्षांत झालेला नाही, असे ते म्हणाले. ‘ही समस्या बंगळुरूची नसून केवळ दोन प्रदेशांची आहे. लहान टाक्या असल्याने पाणी ओसंडून वाहत असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काँग्रेस सरकारच्या कुशासनाचा आणि नियोजनशून्य कारभाराचा हा परिणाम आहे. त्यांनी हळूहळू तलाव पूर्ण केले’ असेही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) म्हणाले.

बेंगळुरूमध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी १,५०० कोटी आणि अतिक्रमण हटवण्यासाठी ३०० कोटी मंजूर केले आहेत. बेंगळुरू व्यतिरिक्त हवामान खात्याने कोडागू, दक्षिण कन्नड, उत्तरा कन्नड, उडुपी आणि चिकमंगळूरमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. प्रशासनाने एसडीआरएफची टीम बाधित भागात पाठवली आहे. बोटीतून लोकांना सुरक्षित स्थळी नेले जात आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT