Crime Sakal
देश

Muslim Headmaster: खळबळजनक! मुस्लिम मुख्यध्यापकास शाळेतून हटवण्यासाठी चक्क पाण्याच्या टाकीतच मिसळले विषारी रसायन

Karnataka School Shocking Incident : विशेष म्हणजे हे कृत्य घडवण्यासाठी शाळेतीलच इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्याला हाताशी धरण्यात आल्याचंही समोर आलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Shocking Poisoning Attempt in Karnataka School: कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील मुस्लिम मुख्यध्यापकास पदावरून हटवण्यासाठी, कथितरित्या पाण्याच्या टाकीत विषारी रसायन मिसळले गेल्याचे समोर आले आहे. १४ जुलै रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी तीन जणांना अटक केली गेली आहे. ज्यामध्ये श्री राम सेना नावाच्या एका उजव्या विचारसणीच्या संघटनेशी निगडीत असलेल्या स्थानिक नेत्याचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे हे कृत्य घडवण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्याला हाताशी घेण्यात आल्याचंही समोर येत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा उद्देश मुख्यध्यापक सुलेमान गोरिनाइक जे मागील १३ वर्षांपासून हुलिकट्टी येथील सरकारी लोअर प्राइमरी स्कूलमध्ये कार्यरत आहेत, यांच्या सभोवताली दहशतीचे आणि संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा होता. पोलिसांनी सांगितले की, कथितरित्या या मुख्यध्यापकाची प्रतिमा डागळणे आणि त्यांची बदली करण्यासाठी हा कट रचला गेला होता.

शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीतल पाणी पिल्याने जवळपास १२ विद्यार्थी आजारी पडले होते. तशी तर ही लक्षणं जीवघेणी नव्हती, परंतु शालेय प्रशासन आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी पुरेशी होती. आरोग्य अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की, मुलांवर तत्काळ उपचार केले गेले आहेत आणि आता ते ठीक आहेत.

याशिवाय पोलिसांना आढळले की, विषारी रसायन पाण्यात मिसळण्याची ही घटना इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांमार्फत केली गेली होती. विद्यार्थ्याने सांगितले की, त्याला एका हानिकारक रसायनाने भरलेली बाटली दिली गेली होती आणि त्याला ते पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मिसळण्यास सांगितले होते. तर एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ती बाटली देणाऱ्याची ओळख कृष्ण मदार अशी समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसारात लुडबूड केली तर पत्नी पतीच्या गर्लफ्रेंडकडे मागू शकते नुकसान भरपाई; हायकोर्टाचा निर्णय

Oneplus Sale : चक्क 50% पर्यंत डिस्काउंट! वनप्लसचा सेल सुरू; 'या' 7 प्रीमियम स्मार्टफोनवर 12 हजारची सूट, सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

Success Story: भूमिहीन बापाचा मुलगा बनला राज्यकर निरीक्षक; कावळगावच्या आकाश घंटे च्या खडतर परिश्रमाची यशोगाथा

Surya Grahan In September: आजचे सूर्यग्रहण अद्भूत! शुभ फळे मिळविण्यासाठी कोणते विशेष उपाय करावे? वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : पुण्याच्या म्हाडा वसाहतीत गुंडांचा राडा

SCROLL FOR NEXT