बाहुबली मूर्तीच्या महामस्तकाभिषेक सोहळ्यास सुरुवात 
देश

भगवान बाहुबली भक्तिरसात चिंब (व्हिडिआे)

संजय खूळ

श्रवणबेळगोळ - भगवान बाहुबलींच्या जयजयकारात आणि अष्टगंध, दूध, चंदन यासह विविध द्रव्यांनी अभिषेकात येथील बाहुबली मूर्तीच्या महामस्तकाभिषेक सोहळ्यास सुरुवात झाली. हा मनोहारी सोहळा पाहण्यासाठी चंद्रगिरी पर्वतावर लाखोंचा जनसमुदाय जमला होता. जगद्‌गुरू चारूकीर्ती भट्टारक महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा महामस्तकाभिषेक सोहळा झाला. दर बारा वर्षांनी होणाऱ्या सोहळ्याला तब्बल एक हजार वर्षांची परंपरा आहे. यापूर्वी २००६ मध्ये सोहळा झाला होता.

आजच्या या सोहळ्याची तब्बल २ वर्षे तयारी सुरू होती. आज सकाळी दहापासून विविध धार्मिक सोहळ्यास सुरुवात झाली. जागतिक वारसा असलेल्या या मूर्तीवर अभिषेकच्या द्रव्याचा कोणताही परिणाम होऊ नये म्हणून प्रक्रिया केली होती. विंध्यगिरी पहाडावर असलेल्या या मूर्ती परिसरात अत्यंत कमी जागा आहे. मात्र जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून उभारलेल्या पहाडावर तब्ब्ल ६ हजार जण बसण्याची सोय होती. त्यामध्ये कलशधारक, त्यागी, अतिमहनीय व्यक्ती, माध्यमांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता.

सकाळी आचार्य श्री वर्धमान सागर महाराज आणि चारूकीर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम सुरू झाले. दुपारी दोन वाजता १०८ कलशांतून अभिषेकास सुरुवात झाली. आजचा पहिला कलश ओतण्याचा मान आर. के. मार्बलचे अशोक यांना मिळाला होता. कुटुंबीयांनी हा सुवर्णकलश रिता केला अन्‌ प्रचंड जयघोष आणि मंगल वाद्यांचा गजर झाला.

मूर्तीवर १०८ कलशाभिषेक झाल्यानंतर पंचामृत अभिषेकास सुरुवात झाली. दूध, हळद, चंदन अभिषेकास सुरुवात झाली. प्रत्येक अभिषेकानंतर बदलत जाणाऱ्या मूर्तीचा रंग मनोहारी दिसत होता. हा अभिषेक चंद्रगिरी पहाडावरून लाखो लोक पाहत होते.

असा झाला अभिषेक
मूर्तीवर प्रथम जलाभिषेक झाला. त्यानंतर नारळपाणी, उसाचा रस, दूध, भाताचा कोंडा, हळद, हर्बल असा अभिषेक झाल्यानंतर कलशाभिषेकचा पहिला मान मिळविलेल्या पाटणी परिवाराने कलशाभिषेक केला. दुसरा, तिसरा आणि चौथा कलश ओतण्याचा मान मिळविलेल्या भाविकांनी कलश ओतले. म्हैसूर सॅंडल पेस्ट, कलर चंदन, ८ प्रकारच्या चंदनाने अभिषेक झाला. द्रव्य अभिषेकानंतर फुलांचा अभिषेक सुरू झाला. तीन प्रकारच्या फुलांच्या अभिषेकानंतर मध्यवर्ती कलश ओतला. इंद्र अष्टद्रव्य पूजेनंतर विद्युत रोषणाईमध्ये मंगल आरती झाली व पहिल्या दिवसाचा महामस्तकाभिषेक सोहळा झाला. दरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या व कर्नाटकच्या अनेक मंत्र्यांनी महामस्तकाभिषेक सोहळ्यास उपस्थिती लावून अभिषेक केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Ghee Adulteration : तिरुपती लाडूच्या तुपात पाम तेल आणि रसायनांचा वापर? EDकडून कंपनीच्या प्रवर्तकाला अटक

Farmer Loss Assessment : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; पाच ऑक्टोबरपासून पंचनामे करण्याचे आदेश

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Ancient Ganesh Idol : गणेशोत्सवात अद्भुत योग! 1800 वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आलास गावात सापडली 1200 वर्षे जुनी चालुक्यकालीन प्राचीन गणेशमूर्ती अन् नंदी

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

SCROLL FOR NEXT