

सक्तवसुली संचालनालयाने तूप बनवणारी कंपनीच्या कैलाश चंद मंगला यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केलीय. ईडीने कारवाईनंतर सांगितलं की, तिरुपती लाडू प्रसाद तयार करण्यासाठी वापरलं जाणारं तूप हे रिफाइंड पाम ऑइल, पामोलीन आणि वेगवेगळ्या रसायनांनी बनवलं होतं. केंद्रीय तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानच्या लाडुसाठी वापरलेल्याॉ तुपात भेसळ प्रकरणी हैदराबादमधील ईडी कार्यालयाने सुकृति फूड्सच्या कैलाश चंद मंगला यांना ताब्यात घेतलंय.