Kalaburagi District esakal
देश

शिवलिंगाच्या शुद्धीकरणासाठी हिंदू संघटनांचा दर्ग्यात घुसण्याचा प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

भाजप खासदारानं पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शिवलिंगाचे 'शुद्धीकरण' करण्यासाठी दर्गा परिसरात मोठी रॅली काढली.

कलबुर्गी जिल्ह्यातील (Kalaburagi District) अलंद येथे मंगळवारी म्हणजेच, 1 मार्च रोजी झालेल्या जातीय तणावानंतर कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) 167 जणांना अटक केलीय. दरम्यान, परिसरात कलम 144 लागू असताना दोन्ही बाजूच्या गटांनी सोमवारी लाडले मशक दर्ग्यात (Ladle Mashak Dargah Aland, Karnataka) प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानं शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय.

हिंदू संघटनांना नोव्हेंबर 2021 मध्ये शिवलिंगाचे 'शुद्धीकरण' करण्यासाठी विशेष प्रार्थना करायची होती. त्याच दिवशी याच आवारातील दर्ग्यात शबाब-ए-बारात कार्यक्रम आयोजित करण्याची तयारीही विशेष पंथानं केली होती. त्यामुळं पोलीस प्रशासनानं कलम 144 लागू करून 27 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत परिसरात जमण्यास बंदी घातली होती. मात्र, असं असतानाही श्रीराम सेनेनं (Shriram Sena) लाडले मशक दर्गा येथील राघव चैतन्य शिवलिंगाचे शुध्दीकरण 1 मार्च रोजी करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर घटनास्थळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

पोलिसांचं म्हणणं आहे की, भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री भगवंत खुबा (Bhagwanth Khuba) यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शिवलिंगाचे 'शुद्धीकरण' करण्यासाठी दर्गा परिसरात मोठी रॅली काढली होती. यादरम्यान त्यांनी बंदी असतानाही धार्मिक स्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दर्ग्याच्या आवारात फक्त 10 लोकांना शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी दिली होती. मात्र, नेत्यांनी ते मान्य न करता सर्वांना परवानगी द्यावी, असा आग्रह धरला आणि आंदोलन सुरू केलं. त्याच बरोबर इतर धर्मीय मोठ्या संख्येनं दर्ग्याजवळ जमा झाले आणि त्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या 10 नेत्यांना परवानगी देण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध केला. यानंतर झालेल्या दगडफेकीत डीसी आणि एसीपींच्या वाहनांचं मोठं नुकसान झाल्याचं समजतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्रात परिणाम! महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय; आता LPG पुरवठ्यावर नजर राहणार

लखनौचा कायापालट! ४५ मिनिटांचा प्रवास आता फक्त १५ मिनिटांत; पाहा योगींचा 'ग्रीन' प्लॅन!

PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा आले २ हजार रुपये! PM मोदींनी जारी केला २२ वा हप्ता; यूपीच्या शेतकऱ्यांवर पैशांचा पाऊस!

March Ending: 31 मार्चपूर्वी करा हे काम! नाहीतर PF आणि पेन्शन खाते होऊ शकते निष्क्रिय; करसवलतीचा लाभही मिळणार नाही

Ayodhya Ram Mandir : काय आहे राम मंदिरात बसवले जाणारे 'श्री राम यंत्र'? राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार भव्य सोहळा!

SCROLL FOR NEXT