Karnataka Politics Operation Lotus Campaign esakal
देश

कर्नाटकात Operation Lotus फेल? भाजपच्या 'या' बड्या नेत्यानं घेतली मुख्यमंत्र्यांची गुप्त भेट, लवकरच होणार 'घरवापसी'

दोन्ही नेत्यांनी सिद्धरामय्या यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर उत्सुकता वाढली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोमशेखर मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे कारण देताना मतदारसंघातील विकासकामांचे निमित्त सांगत आहेत. शिवराम हेब्बारही त्यांच्या भेटीमागे असेच कारण देत आहेत.

Karnataka Politics : मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे भाजपचे माजी मंत्री एस. टी. सोमशेखर यांनी सिद्धरामय्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर माजी मंत्री शिवराम हेब्बार यांनीही सिद्धरामय्या यांची भेट घेऊन गुप्त चर्चा केली.

त्यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यात ऑपरेशन कमळनंतर (Operation Lotus) सिद्धरामय्या यांच्या जवळच्या वर्तुळात ओळखले जाणारे शिवराम हेब्बार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते १७ आमदारांपैकी ते एक होते.

भाजपचे काही आमदार पुन्हा काँग्रेसमध्ये (Congress) येणार असल्याच्या चर्चा आतापासूनच सुरू आहेत. १७ आमदारांपैकी माजी आमदार एच. विश्वनाथ यांनी आधीच भाजपला निरोप दिला आहे. मात्र, पक्षांतराबाबत माजी मंत्री एस. टी. सोमशेखर आणि शिवराम हेब्बार यांनी खंडन केले आहे.

दोन्ही नेत्यांनी सिद्धरामय्या यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर उत्सुकता वाढली आहे. सोमशेखर मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे कारण देताना मतदारसंघातील विकासकामांचे निमित्त सांगत आहेत. शिवराम हेब्बारही त्यांच्या भेटीमागे असेच कारण देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT