राज्यसभा
राज्यसभा  Sakal
देश

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान; BJP-JDSला क्रॉस वोटिंगची भीती, काँग्रेस आमदार रिसॉर्टवर

सकाळ डिजिटल टीम

कॉंग्रेस आमदार (Congress MLA) रिसॉर्टवर रवाना झाले आहेत. राज्यसभेच्या चार जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणूक होत आहे.

बंगळूर : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) आज (ता. २७) मतदान होणार असून, भाजपला दोन असंतुष्ट आमदारांचीच चिंता लागून राहिली आहे. भाजपचे (BJP) असंतुष्ट आमदार एस. टी. सोमशेखर आणि शिवराम हेब्बार यांची काय चाल राहणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. एवढेच नाही, तर धजदलाही (JDS) एका आमदाराच्या क्रॉस मतदानाची भीती वाढली आहे. त्यामुळे निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता आहे.

दरम्यान, कॉंग्रेस आमदार (Congress MLA) रिसॉर्टवर रवाना झाले आहेत. राज्यसभेच्या चार जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणूक होत आहे. आमदारांच्या संख्येनुसार भाजपकडे ६६ मते आहेत. भाजपच्या उमेदवाराला ४५ मते आणि धजद अर्थात आघाडीचे उमेदवार कुपेंद्र रेड्डी यांना उर्वरित २१ मते देण्याचा भाजपचा विचार आहे.

याबाबत आधीच धोरण आखण्यात आले आहे. तसेच अपक्षांची मते किंवा क्रॉस-व्होटिंगद्वारा उर्वरित आवश्यक मते मिळविण्याचा युतीचा प्रयत्न आहे. मात्र, काँग्रेस आमदारांना आकर्षित करण्याऐवजी भाजपला स्वपक्षीय आमदारांचीच चिंता आहे. कारण एस. टी. सोमशेखर अलीकडे पक्षाशी अंतर ठेवून आहेत. त्यांनी पक्षातील काही नेत्यांच्या विरोधात वक्तव्य केले आहे.

भाजपच्या बैठकीला दोन आमदार अनुपस्थित

विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या नेतृत्वाखाली बोलावलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला सोमशेखर आणि शिवराम हेब्बार अनुपस्थित होते. निवडणुकीत मतदान करणाऱ्या आमदारांना मतपत्रिका मतपेटीत टाकण्यापूर्वी त्यांची मते त्यांच्या पक्षाच्या एजंटला दाखवावी लागतात. त्यामुळे क्रॉस व्होटिंग उघड होईल. भाजपचे असंतुष्ट दोन आमदार आधीच काँग्रेसकडे वळल्याची माहिती आहे.

दुसरीकडे, धजदलाही क्रॉस व्होटिंगची भीती आहे. धजदने भाजपसोबत केलेल्या युतीमुळे नाराज असलेले आमदार शरणगौडा कंदकूर यांची वाटचालही उत्सुकतेचे कारण आहे. तेही काही मुद्द्यांवर पक्षाशी अंतर ठेवले आहेत. या संदर्भात राज्यसभा निवडणुकीत ते कोणाच्या बाजूने उभे राहणार याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे. विधानसभेच्या संख्याबळानुसार काँग्रेसला तीन तर भाजपला एक जागा जिंकण्याची संधी आहे. भाजप-धजद युतीने धजदचे कुपेंद्र रेड्डी यांना पाचवे उमेदवार म्हणून उभे केले आहे. कुपेंद्र रेड्डी यांना विजयासाठी ४५ मतांची आवश्यकता आहे.

भाजप-धजदकडे अतिरिक्त ४० मते आहेत. तर, कुपेंद्र रेड्डी यांना पाच मतांची कमतरता असून ही मते मिळविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरु आहे. काँग्रेसमध्ये क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे कुपेंद्र रेड्डी निवडणूक जिंकणार की पराभूत होणार, हे जाणून घेणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

निवडणुकीची तयारी

विधानसौधमध्ये जय्यत तयारी केली असून पहिल्या मजल्यावरील समिती कक्ष क्रमांक १०४ मध्ये मतदानाची व्यवस्था केली आहे. राज्य विधानसभा मंत्रालयाच्या सचिव विशालाक्षी या निवडणुकीसाठी रिटर्निंग अधिकारी असतील. काँग्रेसचे उमेदवार अजय माकन, सय्यद नजीर हुसेन, चंद्रशेखर हे विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीत पहिल्या पसंतीच्या मतासह काँग्रेसच्या कोणत्या उमेदवाराला मतदान करायचे, दुसऱ्या पसंतीचे मत कोणाला द्यायचे, याची यादी आमदारांना दिली जाणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

जनार्दन रेड्डींची भेट

दरम्यान, मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी आज अपक्ष आमदार जनार्दन रेड्डी यांची भेट घेऊन पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याची विनंती केली. तेही उद्याच्या मतदानात काय करणार, हे पहाणेही उत्सुकतेचे ठरेल.

थेट विधानसभेत येणार

क्रॉस व्होटिंग होऊ नये, यासाठी काँग्रेसच्या सर्व आमदारांना आज रिसॉर्टमध्ये नेण्यात आले. बंगळूरमधील मान्यता टेक पार्कजवळील तारा रिसॉर्टमध्ये ते मुक्काम करतील. उद्या होणाऱ्या मतदानासाठी रिसॉर्टमधून थेट विधानसभेत येतील. तेथेच काँग्रेस विधिमंडळ पक्षाची सायंकाळी बैठक आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आमदारांना मार्गदर्शन करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT