Karnataka Pilgrims Bus Accident esakal
देश

Pilgrims Bus Accident : यल्लम्मा देवीचं दर्शन घेऊन परतताना मोठी दुर्घटना! मिनी बस-ट्रकच्या धडकेत 13 यात्रेकरू ठार, दोन जण गंभीर जखमी

कर्नाटकात यात्रेकरूंच्या बसचा मोठा अपघात झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथून यल्लम्मा देवीचं दर्शन घेऊन परतताना ही मोठी दुर्घटना घडलीये.

हावेरी (कर्नाटक) : कर्नाटकात यात्रेकरूंच्या बसचा मोठा अपघात झाला आहे. हावेरी जिल्ह्यात ही मोठी दुर्घटना घडली आहे. येथील ब्याडगी तालुक्यात शुक्रवारी पहाटे मिनी बस उभ्या असलेल्या ट्रकला धडकून झालेल्या अपघातात 13 जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

हे सर्वजण तीर्थयात्रा करून परतत होते. पोलिसांनी सांगितलं की, पीडित शिवमोग्गा येथील रहिवासी आहेत. ते बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथून यल्लम्मा देवीचं दर्शन घेऊन परतताना ही मोठी दुर्घटना घडलीये.

दरम्यान, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. बस चालकाला झोप लागली होती, त्यामुळं हा अपघात झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पुढील तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी; भोंगवली सबस्टेशनविरोधात कापूरहोळमध्ये रास्ता रोको, ट्रॅक्टर-बैलगाड्यांसह ग्रामस्थ रस्त्यावर

Dhamangaon Farmer Case: संसाराचा गाडा हाकणारा आधारवड कोलमडला; ५२ वर्षीय शेतकऱ्याची कर्जबाजारीपणातून जीवन संपवलं

Google वर एक स्टार रिव्ह्यू; कंपनीने महिलेवरच दाखल केला मानहानीचा दावा... काय आहे प्रकरण?

Marathi News Live Updates : मोदी सरकारच्या १२ वर्षात मृत्यू स्वस्त झाला; संजय राऊत यांचा घणाघात

Rahul Gandhi Shirt Shoes Brand : राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमानंतर शर्ट-शूजची चर्चा; ब्रँड कोणता, किंमत किती? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT