karnatka education department has dropped Tipu Sultan's textbook from the seventh grade textbook 
देश

टिपू सुलतानचा पाठ अभ्यासक्रमातून वगळला ; कॉंग्रेसने घेतला आक्षेप...

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर - कोरोना संसर्गामुळे अभ्यासक्रमात कपात करून शिक्षण विभागाने टिपू सुलतानचा पाठ सातवीच्या पाठ्यपुस्तकातून वगळला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर कॉंग्रेसने आक्षेप घेतला. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय दिवस कमी करण्यात आल्याने शिक्षण विभागाने काही अभ्यासक्रम सोडण्याचा निर्णय घेतला. टिपू सुलतानला सुरवातीपासून विरोध करणाऱ्या भाजप सरकारने या परिस्थितीचा लाभ घेऊन टिपूचा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकातून वगळला आहे. आपला अजेंडा साध्य करण्यासाठी सरकारने परिस्थितीचा लाभ उठविल्याचा आरोप राज्य कॉंग्रेसने केला आहे.

पत्रकारांशी बोलताना प्रियांक खार्गे म्हणाले, की भाजप केवळ टिपूचे विचारच नव्हे, तर राज्यघटना, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीमधूनही मजकूर कापत आहे. घटनानिर्मितीत कोणताही सहभाग नसलेले भाजप नेते इतिहासाचे भगवेकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजप, आरएसएस स्वातंत्र्यसैनिकांबद्दल लोकांना सांगत नाहीत. स्वातंत्र्यलढ्याच्या कठीण संघर्षाचा नाश करून ते तरुणांना चुकीचा मार्ग दाखवत आहेत. 'केपीसीसी'चे कार्याध्यक्ष सलीम अहमद यांनीही, सरकारने तातडीने आपल्या निर्णयावरून माघार घ्यावी, अशी मागणी केली आहे. 

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण, चांदीही स्वस्त; तुमच्या शहरातील ताजा भाव जाणून घ्या

Satej Patil : आमदार सतेज पाटील यांची 'वाट' बिकट; नगरपालिकांच्या निकालाने बदलले समीकरण, काय असणार पुढची रणनीती?

Vidarbha Cold Wave: हिवाळा रंगात, थंडी जोरात; नागपूरचा पारा ८.२ अंशांवर, गोंदिया @ ८

WTC 2027 Final : न्यूझीलंडचा विजय अन् टीम इंडियाच्या फायनलचा मार्ग बंद; ऑस्ट्रेलियासोबत किवींची Point Table मध्ये मजबूत पकड

आजचे राशिभविष्य - 22 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT