Kashi Vishwanath Mandir Sakal
देश

काशी विश्वनाथ मंदिरात करता येणार लग्नासह अनेक धार्मिक विधी

सकाळ डिजिटल टीम

kashi vishwanath temple : वाराणसीच्या नव्याने बांधण्यात आलेल्या काशी विश्वनाथ धाममध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये आणखी एका सुविधेची भर पडणार आहे. काशीतील विश्वनाथ मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी दररोज भाविक मोठ्या संख्येने येतात. दरम्यान आता काशीविश्वनाथाच्या दर्शनासोबतच मंदिर परिसरात धार्मिक कार्य तसेच लग्न कार्य करण्याची संधी भक्तांना मिळणार आहे.

विश्वनाथ मंदिर प्रशासनाने त्याची संपूर्ण रूपरेषा तयार केली आहे. या संदर्भात काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील वर्मा म्हणाले की, जेव्हा पासून विश्वनाथ धामचा जीर्णोद्वार करण्यात आला आहे, तेव्हापासून आम्ही भक्तांसाठी अनेक उपक्रम सुरू करत आहोत. 'अक्षय दर्शन असो, धार्मिक कार्य असो किंवा सामाजिक कार्य असो, विश्वनाथ धाममध्ये चर्चासत्र असो की लग्न, त्यासाठीही आम्ही नियोजन करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

सुनील वर्मा म्हणाले की, अनेक लोक यात रस दाखवत आहेत. विवाह किंवा सामाजिक कार्याबाबतच्या नियमांच्या प्रश्नावर सुनील वर्मा म्हणाले की, केवळ सर्वसामान्य नियम लागू होतील, धार्मिकदृष्ट्या वैध नसलेल्या अशा कोणत्याही कृतीला परवानगी दिली जाणार नाही असे त्यांनी सांगीतले.

विश्वनाथ मंदिराच्या बांधकामानंतर सेवांचा सातत्याने विस्तार होत आहे. भाविकांचे हित लक्षात घेऊन जी काही धार्मिक कार्ये पुढे नेली जात आहेत. त्यांच्या धार्मिक कार्यात वाढ व्हावी यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो. मग ते दर्शन असो, कर्मकांड असो किंवा धार्मिक कार्य असो. या अंतर्गत लवकरच या प्रांगणात लग्न आणि इतर सामाजिक कार्यक्रमही होणार आहेत. अशा परिस्थितीत आम्ही लग्न आणि सामाजिक कार्यासाठी एका खासगी कॉंट्रॅक्टर नेमणार असल्याचे सांगितले. मात्र, या कार्यक्रमांमध्ये डीजेसोबतच इतरही अनेक बंधने असतील, असे वर्मा म्हणाले.

लग्नाच्या कार्यक्रमात पाहुण्यांना फक्त शुद्ध जेवण मिळेल. याशिवाय मंदिराच्या प्रतिष्ठेच्या विरोधात असे कोणतेही काम केले जाणार नाही. भाविकांच्या दर्शनात कोणतीही अडचण येऊ नये, याचीही दखल या कार्यक्रमांतून घेतली जाणार आहे. मदिदार विवाह किंवा अन्य धर्माशी संबंधित सामाजिक कार्य करण्यासाठी शुल्क अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. यावरही लवकरच निर्णय घेतला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour : पुणे ग्रॅंड स्पर्धेत लाखमोलाच्या सायकलींची साथ; अत्याधुनिक आणि लाखो रुपयांच्या सायकलींचीचुरस

US Iran Conflict: जग युद्धाच्या उंबरठ्यावर! अमेरिकेची महाविनाशकारी युद्धनौका इराणसमोर, क्षणात युद्ध पेटण्याची भीती

Municipal Mayor Election : पुणे, मुंबईत ‘महिलाराज’! महापौरपदाची सोडत जाहीर; ठाणे अनुसूचित जातीसाठी राखीव

IndiGo Bomb Threat : दिल्ली-पुणे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, टॉयलेटमधील चिठ्ठीमुळे प्रवाशांत घबराट, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : प्रजासत्ताकदिनी शाळांना सुटी नाही; शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी जारी केला आदेश

SCROLL FOR NEXT