kashmir file photo
देश

12 तासात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा दलाला मोठं यश

सकाळ डिजिटल टीम

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने गेल्या १२ तासात लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये (Jammu And Kashmir) सुरक्षा दलाने गेल्या १२ तासात लष्कर ए तोयबा (LeT) आणि जैश ए मोहम्मदच्या (JeM) पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. दोन वेगवेगळ्या चकमकीत मिळून ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये जैशचा कमांडर जाहीद वाणी (Jahid Wani) याच्यासह एका पाकिस्तानी (Pakistan) दहशतवाद्याचा समावेश आहे. काश्मीरच्या आय़जीपींनी हे सुरक्षा दलाचे मोठे यश असल्याचं म्हटलं आहे.

जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री बडगाम जिल्ह्यातील चरार ए श्रीफ आणि पुलवामा जिल्ह्यात नायरा इथं सुरक्षा दलाने शोधमोहिम राबवली. यावेळी बडगाममध्ये एक आणि पुलवामात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

जाहिद मंजूर वाणी हा जम्मू काश्मीरमध्ये जैशच्या टॉप कॅडरपैकी एक होता. तो पुलवामा हल्ल्यात सहभागी होता. २०१९ मध्ये झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. जम्मू काश्मीरमध्ये शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून भीती पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. कुलगाम जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या हत्येनंतर पुलावामातील नायरा भागात सुरक्षादलांनी गोळीबार केला. तसंच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर फौजफाटाही तैनात करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT