Kashmir ANI
देश

काश्मीरमध्ये चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा; सुरक्षादलाला यश

सकाळ डिजिटल टीम

जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.

जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही. काश्मीर विभागीय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे.

दहशतवाद्यांविरोधात जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांसह सुरक्षा दलाची संयुक्त मोहिम सुरु आहे. सुरक्षा दलाने एक पिस्तूल आणि ग्रेनेड जप्त केलं आहे. अनंतनाग शिवाय बांदीपोरातसुद्धा एक चकमक सुरु झाली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बांदीपोरातील हाजीनमध्ये सुरक्षादलांकडून शोध मोहिम सुरु आहे. बांदीपोरातील ही दुसरी चकमक आहे. याआधी कोकरनाग इथं एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं होतं.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून ठराविक समुदायाला लक्ष्य केलं जात असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर दहशतवाद्यांवर मोठ्या कारवाईची तयारी केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्याच्या प्रशासनासोबत यासंदर्भात चर्चा केली आहे. सुरक्षा एजन्सी आणि गुप्तचर संस्थांकडून काश्मीरमध्ये सक्रीय असलेल्या दहशतवाद्यांची माहिती मागवण्यात आली आहे.

दरम्यान, रविवारी सुरक्षादलांनी मोठी कारवाई करत लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, अल बद्र आणि द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनांशी संबंधित ९०० जणांना ताब्यात घेतलं. यांच्याकडून दहशतवादाला समर्थन दिलं जात असल्याच्या संशयावरून कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT