Farooq Abdullah_Kashir Files 
देश

"आमचा तीव्र द्वेष करावा यासाठी 'काश्मीर फाईल्स' टॅक्स फ्री केला"

'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटावरुन सध्या संपूर्ण देश ढवळून निघाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटावरुन सध्या संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. देशभरात या चित्रपटावरुन उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. यावर आता जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी भाष्य केलं आहे. लोकांमध्ये जास्तीत जास्त द्वेषभावना निर्माण व्हावी यासाठी भाजपप्रणित सरकारकडून हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला.

अब्दुल्ला म्हणाले, “भाजपला द्वेष पसरवून लोकांच्या हृदयात स्थान मिळवायचं आहे. प्रत्येक पोलीस आणि सैनिकानंही हा चित्रपट पाहावा असं ते म्हणतात. कारण चित्रपट पाहावा जेणेकरून ते आमचा जास्तीत जास्त तिरस्कार करतील. जर्मनीमध्ये हिटलर आणि गोबेल्स यांनी देखील असाच प्रकार केला होता. याची तेव्हा सहा लाख ज्यू नागरिकांना किंमत मोजावी लागली होती. भारतातील मुस्लिमांना याची किती किंमत मोजावी लागेल सांगू शकत नाही"

'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट प्रचाराचं व्यासपीठ असल्याची टीका त्यांनी केली. "हा एक प्रोपगंडा चित्रपट आहे. ही एक शोकांतिका होती ज्यामुळं राज्यातील प्रत्येक जीवाला, हिंदू आणि मुस्लिमांवर परिणाम झाला होता. या शोकांतिकेमुळं माझं हृदय अजूनही रक्ताळलेलं आहे. त्यावेळी राजकीय पक्षांचा एक घटक होता ज्यांना वांशिक शुद्धीकरणामध्ये रस होता,” असंही अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

अब्दुल्ला पुढे म्हणाले, "1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांचेच नव्हे तर काश्मीरमधील शीख आणि मुस्लिमांचे काय झालं? याच्या चौकशीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन केला पाहिजे. "त्यावेळी माझे आमदार, माझे कार्यकर्ते आणि माझ्या मंत्र्यांना लोकांचे मृतदेहांचे अवशेष झाडाच्या बुंध्यावरून खाली उतरावे लागले होते"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

IND W vs ZIM W: भारत-झिम्बाब्वे महिला क्रिकेट मालिकेचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठे रंगणार टी-२० आणि वनडे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

BEST Bus Stop: प्रवाशी वाऱ्यावर, बेस्टच्या बस थांब्यात फ्लिपकार्टचं दुकान;वांद्र्यातला धक्कादायक प्रकार

VIRAL VIDEO: ‘रीटेक्सपासून रासपर्यंत’; ऐश्वर्या नारकर यांचा गरबा पाहिलात का? नेटकरी म्हणाले…

SCROLL FOR NEXT