देश

काश्मीरमधील आमदार जनतेतूनच निवडणार : मोदी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील नागरिकांना मला सांगायचे आहे, की यापुढेही तुमचा आमदार, मुख्यमंत्री हा जनतेतूनच निवडण्यात येईल. आपल्याला काश्मीरमधून दहशतवाद, फुटीरतावाद हटवायचा आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर काश्मीरमधील हे कलम हटविण्यात आले आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश करण्यात आले आहेत. देशभरात सरकारच्या या निर्णयाचे कौतुक करण्यात येत आहे. मोदींनी याविषयी प्रथमच सार्वजनिक भाषण करत देशाला उद्देशून भाषण केले.

मोदी म्हणाले, की जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश केले असले तरी तुमचा लोकप्रतिनिधी हा जनतेतूनच निवडला जाईल. लवकरच निवडणुका होतील आणि युवकांना विधानसभेत जाण्याची संधी मिळेल. पारदर्शक वातावरणात तुम्हाला लोकप्रतिनिधी निवडता येतील.

पंचायती निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुका घेण्यात येतील. लडाखमध्ये परिस्थिती वेगळी असेल. काश्मीरमधील पंचायत निवडणुकीमुळे अनेक विधायक कामे पोचविण्यात यश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT