Kashmir Pandit killing case  
देश

काश्मीरमध्ये पुन्हा पंडित ‘टार्गेट’

शोपियाँजवळ दहशतवांद्याकडून दोघा भावांवर गोळीबार, एक मृत्युमुखी

सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यामध्ये आज दहशतवाद्यांनी दोन काश्मिरी पंडित भावांना लक्ष्य करून हल्ला केला यामध्ये सुनीलकुमार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पिंटू कुमार हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, शोपियाँ जिल्ह्यातील छोटीपुरा भागामध्ये सफरचंदाच्या बागेत काम करणाऱ्या या दोन काश्मिरी पंडित भावांवर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारामध्ये एकजण मरण पावला तर अन्य एकजण जखमी झाला आहे.

जखमी भावाला तातडीने नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असले तरी त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे. या घटनेनंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या घटनेनंतर काश्मिरी पंडित संघर्ष समिती (केपीएसएस) आक्रमक झाली असून हे वाढते हल्ले लक्षात घेता समाजबांधवांनी काश्मीर खोरे सोडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. काश्मीर खोऱ्यातील सगळ्याच पंडितांना जीवे मारण्याचा दहशतवाद्यांचा विचार आहे, असे ‘केपीएसएस’चे प्रमुख संजय टिक्कू यांनी सांगितले. काश्मिरी पंडितांनी आता खोरे सोडून जम्मू किंवा दिल्लीसारख्या सुरक्षित ठिकाणांवर आश्रय घ्यावा असेही त्यांनी नमूद केले. मागील ३२ वर्षांपासून आम्ही ही परिस्थिती पाहतो आहोत.

सरकारला काश्मिरी पंडित अल्पसंख्याक समुदायाला संरक्षण देण्यामध्ये अपयश आले असून आम्ही आणखी किती काळ अशा पद्धतीने मरायचे? हे खूप झाले, असा रोषही त्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे या घटनेचा जम्मू- काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याप्रमाणेच अन्य राजकीय नेत्यांनीही निषेध केला आहे. यामध्ये ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे उमर अब्दुल्ला, ‘पीपल्स कॉन्फरन्स’चे सज्जाद गणी लोण आणि भाजपच्या अल्ताफ ठाकूर यांचाही समावेश आहे.

दहशतवादी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यावर हल्ला करत नाहीत, अमरनाथ यात्रेवरही हल्ला झाला नाही. काश्मीर खोऱ्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना देखील लक्ष्य केले जात नाही. काश्मिरी पंडितांना मात्र का लक्ष्य करण्यात येते? या सगळ्यामागे सुनियोजित कारस्थान आहे

- संजय टिक्कू, प्रमुख काश्मिरी पंडित संघर्ष समिती

केंद्र सरकारचे हे मोठे अपयश आहे. ३७० वे कलम काढल्यानंतर काश्मीर खोऱ्यामध्ये शांतता निर्माण होईल असे सांगितले जात होते. काश्मिरी पंडितांना संरक्षण देण्यात केंद्र सरकारला अपयश आले असून त्यामुळे हा समुदाय काश्मीर खोरे सोडून जाण्याच्या तयारीत आहे.

- खा. असदुद्दीन ओवेसी, खासदार एमआयएम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT