Delhi Police Sakal
देश

काश्मीरच्या व्यक्तीला हॉटेलमध्ये मनाई; दिल्ली पोलिसांची स्पष्टोक्ती

यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते असं पोलिसांनी स्पष्ट केलंय.

दत्ता लवांडे

दिल्ली : दिल्लीत सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला तो जम्मू काश्मीरचा रहिवाशी असल्यामुळे हॉटेमध्ये येण्यास मनाई करण्यात येत आहे. त्या व्हिडिओत दिल्ली पोलिसांचे आदेश असल्याने आम्ही काश्मीरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारत असल्याचं सांगितलं जातंय. हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत असताना त्यावर दिल्ली पोलिसांनी ट्वीट करुन कोणतेही निर्देश दिले नसल्याचं स्पष्ट केलंय.

दरम्यान दिल्ली पोलिसांनी ट्वीट करत अशा प्रकारचे कोणतेही निर्देश अथवा आदेश पोलिसांकडून देण्यात आले नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे सध्या नागरिकांकडून पोलिसांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय, यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते असं पोलिसांनी स्पष्ट केलंय.

सदर व्हिडिओमधील पीडित व्यक्तीने युट्यूबवर पोस्ट करत म्हटलंय की मला माझ्या जम्मू काश्मीर येथील असलेल्या ओळखपत्रामुळे हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला गेला आणि पोलिसांचे निर्देश असल्याचं सांगितलं. दरम्यान नंतर बोलताना ती व्यक्ती सांगते की, ती त्याच भागातील दुसऱ्या एका हॉटेलवर थांबली होती, आणि सदर हॉटेलने प्रवेश नाकारण्यासाठी दिलेले ते फक्त कारण होते.

दरम्यान या प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काही लोक जाणीवपूर्वक चुकीचे व्हिडिओ चित्रीत करुन पोलिसांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यामुळे त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावं लागू शकतं. असं पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT