jaish 
देश

सुरक्षा दलाने जैशच्या कमांडरचा केला खात्मा; तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर यश

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून चकमक सुरु आहे. यामध्ये अखेर सुरक्षा दलाने जैशचा कमांडर विलायत लोन उर्फ सज्जाद अफगाणीला ठार केलं आहे. अफगाणीसह त्याच्या साथीदारालासुद्धा कंठस्नान घालण्यात आलं असून अजुन परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे. गेल्या तीन दिवसात चकमकीमध्ये आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलं आहे. 

काश्मीरच्या पोलिस महासंचालकांनी सांगितलं की, जैशच्या मोस्ट वाँटेड कमांडरचा खात्मा झाला आहे. हा कमांडर परिसरातील तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी फूस लावत होता. तसंच अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभागही होता. अफगाणीला ठार करणं हे सुरक्षा दलांचं मोठं यश आहे. अद्याप परिसरात शोध मोहिम सुरु आहे. एक दहशतवादी पळून गेला असून त्याला शोधण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सुरक्षा दलाला दहशतवाद्यांबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी शोपियातील रावलपोराला घेराव घातला होता. जैशचा कमांडर अफगाणी त्याच्या साथीदारांसह लपला असल्याचं समजलं होतं. यानंतर शोध मोहिम सुरु करण्यात आली होती. तेव्हा एका घरामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरु केला होता. तेव्हा सुरक्षा दलाने गोळीबार करत प्रत्युत्तर दिलं होतं. 

शनिवारी रात्री सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं होतं. मात्र दहशतवाद्यांकडून त्याला नकार देत गोळीबार सुरु करण्यात आला. शेवटी रविवारी सुद्धा जोरदार चकमक झाली. यावेळी जहाँगीर नावाच्या दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. तो लष्कर ए तोयबाचा होता. सुरक्षा दलांनी त्यानंतर घर उडवून दिले. मात्र तिथून दोघांनी पळ काढला. दहशतवाद्यांचा पाठलाग सुरुच ठेवला होता. अखेर सोमवारी तिसऱ्या दिवशी या मोहिमेत जैशचा कमांडर अफगाणीला ठार करण्यात आलं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT