देश

पुलवामात दहशतवादी हल्ला; भाजप नेत्याची गोळी घालून हत्या

सूरज यादव

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात बुधवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये भाजपच्या एका नगरसेवकाची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. भाजप नगरसेवक राकेश पंडित हे मित्राला भेटण्याासाठी जात असताना हल्ला झाला. त्यांच्यासोबत दोन खासगी सुरक्षा रक्षक असतात. मात्र ते सोबत नसतानाच हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

पोलिसांच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की, तीन दहशतवाद्यांच्या गटाने रात्री सव्वा दहाच्या सुमारास राकेश पंडित यांच्यावर बेछूट गोळीबार केला. राकेश यांना रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपाचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी परिसरात शोध मोहिम राबवण्यात येत आहे.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात राकेश यांच्या मित्राची मुलगीसुद्धा जखमी झाली आहे. तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राकेश हे सुरक्षेशिवाय त्यांच्या वडिलांच्या गावी गेले होते.

काश्मीरचे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना यांनीही या हल्ल्याची निंदा केली आहे. राकेश पंडित यांचा मृत्यू व्यर्थ जाऊ देणार नाही. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना संपवण्यात येईल. राकेश यांच्यावर झालेला हल्ला हा माणुसकी आणि काश्मिरींची हत्या असल्याचं रविंद्र रैना यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्ती यांनी म्हटलं की, हिंसाचाराच्या असा घटनांनी काश्मीरला नेहमीच दु:ख दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT