Attack On Indian Army Convoy Kashmir Tigers Esakal
देश

Attack On Indian Army Convoy: "लवकरच आणखी विनाशकारी हल्ले सुरू करू," 'या' दहशतवादी संघटनेने स्वीकारली जबाबदारी

Kashmir Tigers: दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे ५ जवान शहीद झाले, तर ५ जवान अजूनही जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

आशुतोष मसगौंडे

जम्मू-काश्मीरमधील कठुआमधील बदनोटा भागात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा घृणास्पद कृत्य केले आहे. येथे दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे ५ जवान शहीद झाले, तर ५ जवान अजूनही जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

काश्मीर टायगर्स नावाच्या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआ भागात काश्मीर टायगर्सच्या दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला.

Letter Of Kashmir Tigers

काश्मीर टायगर्स नावाच्या संघटनेने यासंदर्भात एक पत्रकही जारी केले आहे. पत्रक जारी करून त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

"जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील बदनोटा भागात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी काश्मीर टायगर्स घेत आहे. कठुआ मुजाहिद्दीनच्या बदनोटा भागात काश्मीर टायगर्सनी भारतीय सैन्याच्या ताफ्यावर हल्ला केला, या हल्ल्यात भारतीय सैन्याच्या दोन वाहनांना लक्ष्य करण्यात आले," असे पत्रकामध्ये सुरूवातीला म्हटले आहे.

यामध्ये पुढे लिहिले आहे की, "मुजाहिदीनचा हल्ला इतका भयंकर होता की, भारतीय सैन्याला हलण्याची संधीही मिळाली नाही आणि मुजाहिद्दीन सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाले. आतापर्यंतच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात 7 सैनिक ठार झाले आणि 6 जखमी झाले भारत नेहमीप्रमाणे आपले नुकसान लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे, ज्याचा लवकरच पर्दाफाश होईल हा हल्ला म्हणजे 26 जून 2024 रोजी शहीद झालेल्या तीन मुजाहिद्दीनचा बदला आहे. आम्ही लवकरच आणखी विनाशकारी हल्ले सुरू करू."

दरम्यान कुलगाम जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या चकमकीत मारले गेलेले सहा दहशतवादी हे स्थानिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की दहशतवादी अनेक महिन्यांपासून चनीगाम आणि मोदेरगाम गावात अत्याधुनिक काँक्रीट बंकरमध्ये लपून बसले होते.

सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून एके 47 रायफल्स जप्त केल्या आहेत. एके 47 रायफल्स व्यतिरिक्त, चनीगाम येथील चकमकीच्या ठिकाणाहून एक शक्तिशाली इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (आयईडी) देखील जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT