Ambreen Bhat google
देश

काश्मीरमधील TV अभिनेत्रीची हत्या करणाऱ्या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा

हत्या करणाऱ्या दोन्ही दहशतवाद्यांसह सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांना ठार केलं

सकाळ डिजिटल टीम

काश्मीर येथील बडगाम जिल्ह्यातील चदूरा गावात दहशतवाद्यांनी 25 मे रोजी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात प्रसिद्धी टीव्ही मालिका स्टार अमरीन भट्ट जखमी झाली होती. सुरुवातीला तिची प्रकृती चिंताजनक होती. पण नंतर तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. टीव्ही कलाकार अमरीन भटच्या (Ambreen Bhat) हत्येनंतर आता सुरक्षा दलांनी ही घटना घडवून आणणाऱ्या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला असून काश्मीरमधील अवंतीपुरा (Awantipora) येथे दोन्ही दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती मिळत आहे.

अमरीन ही सोशल मीडियावरही प्रचंड प्रसिद्ध होती. दरम्यान, हत्या करणाऱ्या दोन्ही दहशतवाद्यांसह सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांना ठार केलं. अवंतीपोरा आणि श्रीनगरमध्ये झालेल्या दोन्ही चकमकीत दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्याबरोबरच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर पोलिस आता त्या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या स्लीपर सेलचा शोध सुरु आहे.

हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. सर्व ठिकाणांहून दहशतवाद्यांची गुप्त माहिती घेण्यात आली आणि त्यानंतर हे दोन्ही दहशतवादी अवंतीपुरा भागात लपून बसल्याचं निष्पन्न झालं. सुरक्षा दलांनी त्यांना घेरलं आणि त्यानंतर चकमक सुरू झाली. बराच वेळ चाललेल्या या चकमकीत दोन्ही दहशतवादी मारले गेले.

दरम्यान, 35 वर्षीय टीव्ही कलाकार अमरीन यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पुतण्यालाही गोळी लागली. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अमरीन यांची हत्या त्यांच्या कुटुंबासाठी खूप मोठा धक्का होता. अमरीन यांच्या कमाईतून घर चालायचं. दहशतवाद्यांनी आमच्याकडून सर्व काही काढून घेतलं, असा शोक त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT