Terrorist Sakal
देश

'इस्लाम स्विकारा अन्यथा मरायला तयार रहा'; काश्मिरी पंडितांना धमक्याचे पत्र

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाहीत, असाही इशारा त्या पत्रात दिलाय.

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगर : काश्मिरी फाईल्स चित्रपटावरून देशभरात राजकारण ढवळून निघालं होत. १९९० च्या दरम्यान काश्मिरी हिंदूवर दहशतवाद्यांकडून आत्याचार करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा काश्मिरी हिंदू आणि काश्मिरच्या बाहेरच्या लोकांना निशाना बनवलं जात आहे. काश्मिरी हिंदूसाठी धमक्याचे पत्र येत आहेत. इस्लाम धर्म कबूल करा अन्यथा काश्मीर सोडून परत जा. जर हे तुम्हाला मान्य नसेल तर मरण्यासाठी तयार रहा. अशा धमकीचे पक्ष दहशतवादी संघटना लश्कर-ए-इस्लाम यांच्याकडून येत आहेत.

बारामुल्ला जिल्ह्यात राहणाऱ्या विजय रैना यांनाही या धमकीचे पत्र मिळाले असून त्यामध्ये इस्लाम धर्म स्विकारा नाहीतर काश्मिर सोडा आणि या गोष्टी मान्य नसतील तर मरण्यासाठी तयार रहा. अशा धमक्या दिल्या आहेत. रैना यांनी सांगितलं की हे पत्र लष्कर-ए-इस्लाम या दहशतवादी संघटनेकडून मिळालं असून काश्मिर घाटात राहणाऱ्या हिंदूंना ही धमकी दिली आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाहीत, असाही इशारा त्या पत्रात दिल्याचं रैना यांनी सांगितलं.

पोस्टाद्वारे मिळाले पत्र

काश्मिरच्या या घाटाच्या भागात पत्र पोहचण्यासाठी पोस्टाचा वापर होतो. त्याद्वारेच हे पत्र त्यांना मिळाले असून रैनांव्यतिरिक्त बारामुल्ला मध्ये राहणाऱ्या अनेक हिंदूंना अशा आशयाचे पत्र मिळाले आहे.

दरम्यान रैना बोलताना म्हणाले की, हे पत्र फक्त त्यांना एकट्यांनाच मिळालं नसून बारामुल्ला जिल्ह्यातील विरवल कॉलनीत राहणाऱ्या सर्व काश्मिरी पंडितांना धमक्याचं पत्र मिळालं आहे. ते म्हणाले की, काश्मिरी पंडित आता या धमक्यांना घाबरणार नाहीत. काश्मिरमधील मुस्लीमांसारखा आम्हालाही इथे राहण्याचा हक्क आहे, आम्हाला शांतता आणि प्रगती पाहिजे. काश्मिरमधील मुस्लीमसुद्धा या दहशतवादाला कंटाळला असून आता त्यांनाही शांततेत राहायचं आहे. असं रैना यांनी सांगितलं.

दरम्यात त्यांनी उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि काश्मिर पोलिस यांना आरोपींना अटक करण्याची मागणी केली असून मागच्या काही महिन्यात काश्मीरमध्ये टार्गेट किलींग वाढली असून ही धोक्याची घंटा असल्याचं सांगितलं. याप्रकरणी योग्य पावले उचलण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच काश्मिरमधील बदलते वातावरण काही राष्ट्रविरोधी लोकांना पचणारे नाही म्हणून हिंदू पंडितांना घाबरवण्यासाठी असे प्रयत्न केले जात असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सतीश कुमार या काश्मिर हिंदूची घरात घुसून हत्या केली होती. त्याअगोदर ४ एप्रिलला शोपिया जिल्ह्यात बाळकृष्ण भट यांना गोळी मारण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: फरार कृष्णा आंधळेच्या शोधाबाबत अहवाल सादर करा; न्यायालयाच्या सूचना; १२ डिसेंबरला आरोप निश्‍चिती शक्य

Pune Police : आंदेकर टोळीने उमरटीतून १५ पिस्तुले विकत घेतली;टोळीवर आणखी एक गुन्हा दाखल होणार!

Ghodegaon Theft : घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत!

Pune New Police Stations : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ; शहरात पाच नवीन पोलिस स्टेशन्स वाढणार, जाणून घ्या कुठे?

WPL 2026 All Team Players: दीप्ती शर्मा महागडी खेळाडू, तर मुंबई इंडियन्सनेही केरसाठी मोजले ३ कोटी; पाहा लिलावानंतरचे सर्व संघ

SCROLL FOR NEXT