Terrorist Sakal
देश

दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडित शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या

काश्मिरमध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्येचे सत्र सुरूच आहे.

दत्ता लवांडे

कुलगाम : जम्मू काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यात एका काश्मिरी पंडित शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. कुलगाम जिल्ह्यातील गोपालपोरा येथे दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. त्या गोपालपोरा येथील सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. दरम्यान आज पहाटे अवंतीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

(Terrorists Gun Down Hindu Teacher In Jammu And Kashmir's Kulgam)

काश्मिरमध्ये हिंदूच्या हत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान रजनी बाला असं आज हत्या करण्यात आलेल्या काश्मिरी पंडित शिक्षिकेचं नाव आहे. त्यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचं समजलं आहे. या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं काश्मीर पोलिसांनी सांगितलं आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी शाळेच्या परिसराला घेराव घातला असून संशयित दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

School

काश्मीर परिसरात एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करून हत्या करण्याचं प्रमाण वाढलं असल्यामुळे पोलिस सतर्क आहेत. आज पहाटेच्या दरम्यान पुलवामा जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ठार करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याने काश्मीर नागरिकाची हत्या केली असल्याचं माहितीतून समोर आलं आहे. सोमवारी रात्री उशीरा पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागातील राजपोरा येथे सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केल्यानंतर ही चकमक झाली, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

दरम्यान काश्मिरमध्ये पंडितांच्या हत्या वाढल्या असून मागच्या काही दिवसांत पंडितांना लक्ष्य करून हत्या करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल भट्ट या काश्मिरी पंडिताची सरकारी कार्यालयात घुसून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तेथील हिंदुंनी आंदोलन केले होते. त्यापूर्वी काश्मिरमधील पंडितांना काश्मीर सोडा म्हणत दहशतवाद्यांकडून धमक्याचे पत्र आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT