देश

Kedarnath Landslide : केदारनाथ यात्रा मार्गावर झाले भूस्खलन, अनेक जण अडकल्याची भीती

Kedarnath Landslide : राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथकाने शोध आणि बचाव कार्य सुरू केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kedarnath Landslide : सध्या उत्तर भारतात मोठ्या उत्साहात केदारनाथ यात्रा सुरु आहे. यातच उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ यात्रेच्या मार्गावर गौरीकुंड या ठिकाणहून जवळच मोठे भूस्खलन झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

यावेळी ढिगाऱ्याखाली अनेक दुकान उद्वस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. उद्ध्वस्त झालेल्या दुकानांच्या ढिगाऱ्यात अनेक जण अडकले असल्याची भीती वर्तवली जात आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथकाने शोध आणि बचाव कार्य सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भूस्खलनात 10 ते 12 लोक अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर याठिकाणी भूस्कलन झाले. यावेळी ३ दुकानांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

रुद्रप्रयागच्या एसीपी यांनी माहिती दिली कि, बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन सुरू आहे. आम्हाला माहिती मिळाली की दगड कोसळल्याने आणि मुसळधार पावसामुळे तीन दुकाने बाधित झाली आहेत. शोध मोहीम तातडीने सुरू करण्यात आली. असे सांगण्यात आले की सुमारे 10-12 लोक तेथे होते परंतु आतापर्यंत ते सापडलेले नाहीत,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT