Kedarnath 
देश

Kedarnath Controversay: खबळजनक! केदारनाथ मंदिरातील अब्जावधींचं सोन बनलं पितळ; पुरोहितांचा आंदोलनाचा इशारा

काय आहे प्रकार जाणून घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील हिंदुंच पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या केदारनाथ येथील मुख्य मंदिराच्या गर्भगृहामधील भिंतींना बसवण्यात आलेल्या सोन्याचा पत्रा हा पितळ धातूमध्ये बदलला असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. चारधाम महापंचायतचे उपाध्यक्ष आणि केदारनाथचे वरिष्ठ पुरोहित आचार्य संतोष त्रिवेदी यांनी हा आरोप केला आहे. तसेच या प्रकाराविरोधात आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. (Kedarnath temple controversay gold turned into Brass Priests warn of agitation)

काय आहे प्रकरण?

मुंबईतील एका व्यापाऱ्यानं केदारनाथ मंदिराला २३० किलो सोनं दान केलं होतं. या सोन्यातून मंदिराच्या गर्भगृहातील भिंती या सोन्याच्या पत्र्यानं मढवण्यात आला होता. या सोन्याच्या पत्र्यावरुनच आता मोठा वाद निर्माण झाला आहे. केदारनाथच्या पुरोहितांनी सोन्याच्या या लेअरवरुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

संतोष त्रिवेदी यांनी बीकेटीसीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलं की, मंदिराच्या गर्भगृहातील सोनं हे पितळात बदललं आहे. सोन्याचे हे लेअर लावण्यासाठी अब्जावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळं मुख्य पुरोहित संतोष त्रिवेदी यांनी इशारा दिला आहे की, आरोपींच्याविरोधात तात्काळ कारवाई केली नाही तर मोठं आंदोलन उभारण्यात येईल. (Latest Marathi News)

त्यांनी म्हटलं की, बीकेटीसी सरकार आणि प्रशासनात जे कोणी या संपूर्ण घोटाळ्याला कारणीभूत आहेत त्यांची ओळख पटवून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात यावी. इथल्या पुरोहितांनी आधीच इथं सोन्याचा लेअर वापरण्यात विरोध केला होता. पण त्यानंतरही इथं सोन्याचा वापर करण्यात आला, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

बदरी-केदार मंदिर समितीनं फेटाळले आरोप

दरम्यान, बदरी-केदार मंदिर समितीनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. संतोष त्रिवेदींचे आरोप भ्रम निर्माण करणारे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समितीचे सदस्य आर. सी. तिवारी यांनी सांगितलं की, याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. यामध्ये हे सोन सुमारे एक अब्ज रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओमध्ये तथ्थे न तपासचा भ्रामक माहिती दिली जात आहे.

मंदिराच्या गर्भगृहात लावलेलं सोन हे २३,७७७.८०० ग्रॅम आहे. ज्याची किंमत १४.३८ कोटी रुपये आहे. तसेच तांब्याच्या प्लेट्सवर सुवर्णजडीत काम करण्यासाठी १,००१.३०० ग्रॅम आहे. याची किंमत २९ लाख रुपये आहे. त्यामुळं अब्जावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा खोटा आहे. त्यामुळेच ही भ्रामक माहिती पसरवणाऱ्यांविरोधात समितीकडून कडक कारवाई सुरु करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT