kerala
kerala 
देश

केरळ विमान दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा

कोझिकोड - दुबईतून केरळला (Kerala) आलेल्या एअर इंडियाचे (Air India)  विमान क्रॅश झाले. केरळमधील कोझिकोड इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँडिंगवेळी ही दुर्घटना घडली. दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण गंभीर असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.  विमान रनवेवर घसरल्यानतंर त्याचे दोन तुकडे झाले आहेत. विमानाच्या पायलटचा मृ्त्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या विमानातून 191 जण प्रवास करत होते. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

विमान दुर्घटनेनंतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहे. अग्निशामक दल आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळावर पोहोचल्या असून बचाव कार्य सुरू आहे. IX1344 या विमानाने दुबईतून सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी उड्डाण केलं होतं. विमानात एकूण 191 प्रवासी होते. यामध्ये 174 जण वयस्क होते तर 10 नवजात बालकांसह दोन पायलट आणि पाच क्रू मेंबर्सचा समावेश होता. दुर्घटनेत जखमी झालेल्यांनी रुग्णालयात नेलं जात आहे. 

कोझीकोड आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीसीजे) येथे झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि अग्निशमन दलाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच बचाव आणि वैद्यकीय सहाय्य यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
- पी. विजयन, मुख्यमंत्री

केरळमध्ये दिवसभरातील ही दुसरी धक्कादायक घटना घडली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचा कोझिकोड येथे झालेल्या अपघातात समोरचा भाग फुटला असून यामध्ये पायलटचा मृत्यू झाला आहे. तसेच बरेच प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. सुदैवाने विमानाला आग लागली नाही.

- अलफोन्स के.जे.


गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने शुक्रवारी पहाटे इडुक्की जिल्ह्यात भूस्खलनाची घटना घडली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून ८० हून अधिक जण अडकले होते. एनडीआरएफच्या जवानांनी बचावकार्य हाती घेतले होते. तोच सायंकाळी विमान अपघाताची दुसरी घटना केरळमध्ये घडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT