kerala 105 year old Bhagirathi Amma passed fourth grade exam with 75 percentage 
देश

आजीबाई सलाम! 105 व्या वर्षी तुम्ही चौथीत मिळविले एवढे गुण

पीटीआय

केरळः ज्या वयात इतर लोकं देवदर्शन, पूजाअर्चा, आराम यात गुंतून आपले आयुष्याचे शेवटचे दिवस जगत असतात त्या वयात काहीजण इतरांसाठी एक उदाहरण बनतात. याला अपवाद ठरलेली व्यक्ती आहे त्या केरळमधील एक वयस्कर आजीं. भागीरथी अम्मा असं या आजींचं नाव. या आजी सध्या सर्वत्र चर्चेत आहेत कारण वयाच्या 105 व्या वर्षी भागीरथी अम्मांनी चौथीच्या परिक्षेत मिळविलेल्या 74.5 टक्के गुणांमुळे. 

भागीरथी अम्मा केरळच्या कोल्लम येथील पराकुलममध्ये राहतात. खरं तर आजची तरूण मुलं, लहान मुलं पुस्तकाशी नातं तोडून मोबाइलवर आपला अमूल्य वेळ वाया घालवितात. त्यांना परिक्षांची चिड येते. पण 105 वर्ष्यांच्या भागीरथी अम्मांनी आपल्या उतारवयातही शिक्षणाची कास काही सोडली नाही.  त्यांनी आपले शिक्षणाचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या चौथीच्या परिक्षेत भागीरथी अम्मांनी फक्त पास होण्यापुरते नाही तर तब्बल 74.5 टक्के गुण मिळविले आहे. 

105 वर्षांच्या या विद्यार्थीनीने मिळविलेले हे यश सध्या सर्वांना आश्चर्याचा धक्काच देत आहे. वयाने सर्वात मोठी विद्यार्थीनी होऊन परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचा मान भागीरथी अम्मांनी मिळविलेला आहे. 

वयाच्या शंभरी पार केलेल्या आजींनी मिळविलेले हे यश पाहून भागीरथी अम्मांचे कुटुंबीय हे आनंदात असल्याचे दिसत आहे. सर्व कुटुंबाने अम्मांना मिठाई भरवत हा आनंद साजरा केला आहे. कुटुंबातील वयाने सर्वात लहान सदस्याकडून जेष्ठ सदस्याला मिठाई भरवताना अम्मांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत आहे.  खरंच भागीरथी अम्मा या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सर्वोत्तम उदाहरण बनलेल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीची इनसाईड स्टोरी! ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावरुन प्रियंका गांधींचा संताप; म्हणाल्या....

Sachin Vaze: सचिन वाझेंची ५ वर्षांनी जामिनावर सुटका; ५ जिल्ह्यात प्रवेश न करण्याची अट

Stock Market Crash: 4 दिवसांत गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी स्वाहा! शेअर बाजार का कोसळला?

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

Heart Health: ताजी फळे खाणे की ज्युस पिणे? हृदयाच्या आरोग्यासाठी नक्की काय उत्तम? पाहा संशोधन!

SCROLL FOR NEXT