Kerala 
देश

Kerala Floods : पावसाचा कहर सुरुच; 60 जणांचा मृत्यू 

वृत्तसंस्था

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये धुवाधार पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना सुरूच असून, बळींची संख्या 60 वर पोहचल्याचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी आज (रविवार) सांगितले.

केरळमधील एक लाख लोकांना निवारा केंद्रात हलविण्यात आले. केरळमध्ये कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यात गुरुवारपासून (ता. 8) पावसामुळे 20 नागरिकांचा, तर वायनाडमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला. राज्यात सुमारे 988 निवारा केंद्रे उभारली असून, एक लाख सात हजार 699 नागरिकांना तेथे हलविण्यात आले आहे. वायनाड जिल्ह्यातील स्थिती अत्यंत वाईट असून तेथील 24 हजार 990 नागरिकांनी निवारण केंद्रात आसरा घेतला आहे. 

वायनाड आणि मलप्पुरम जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून, त्याच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले आहेत. पावसामुळे वायनाडमधील मदतकार्यात अडथळा येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सेवा आज दुपारपासून पुन्हा सुरू होणार आहे. विमानतळाच्या काही भागांत आलेले पुराचे पाणी ओसरले असून स्वच्छतेस सुरवात झाली आहे.

राहुल गांधींचा आज केरळ दौरा? 
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तेथील पुराची पाहणी करण्यासाठी आणि पूरग्रस्तांना भेटण्यासाठी ते वायनाडला आज दुपारी येणार आहेत. त्यांनी ट्विट करत म्हटले होते, की मी केरळला जाण्याची शक्‍यता आहे. तेथील मदतकार्यात काही अडथळे येणार नसतील तरच मी जाणार आहे. तेथे माझा दोन दिवस मुक्काम असेल. पंतप्रधान, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याशी मी चर्चा केली असून, पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्याचा माझा प्रयत्न आहे. तेथील कॉंग्रेस कार्यकर्त्यांशीही मी चर्चा केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

SCROLL FOR NEXT