Kerala Court Esakal
देश

Kerala Court : न्यायालयानं सुनावली 135 वर्षांची शिक्षा अन् 5 लाखांचा दंड, काय झालं होतं?

चुलत बहिणीवरच लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण

अंकिता खाणे (Ankita Khane)

दोन वर्षांपूर्वी आपल्या अल्पवयीन चुलत बहीणीवर वारंवार बलात्कार करून गर्भधारणा केल्याप्रकरणी केरळ न्यायालयाने सोमवारी एका व्यक्तीला एकूण १३५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. (Latest Marathi News)

केरळ न्यायालयाने एका व्यक्तीला आपल्या चुलत बहिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी १३५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याने आपल्या चुलत बहिणीवर अनेकवेळा बलात्कार केला आणि तिला गरोदरही ठेवल्याचा त्या व्यक्तीवरचा आरोप सिद्ध झाला आहे. या प्रकरणात त्या व्यक्तीला एकूण १३५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पीडितेने बालकल्याण समितीच्या देखरेखीखाली मुलाला जन्म दिल्याचे वकिलाने सांगितले आहे.(Latest Marathi News)

हरिपाद फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयाचे न्यायाधीश साजी कुमार यांनी 24 वर्षीय तरुणाला लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा, भारतीय दंड संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि बाल न्याय कायदा या कायद्यांतर्गत दोषी ठरवून कायद्यांतील तरतुदी अंतर्गत वेगवेगळ्या शिक्षा सुनावल्या आहेत.(Latest Marathi News)

दरम्यान या प्रकरणातील सरकारी वकील रघु. के यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, सर्व प्रकरणांमध्ये, दोषीला एकूण 135 वर्षांची शिक्षा झाली आहे. तसेच, सर्व शिक्षा एकाचवेळी चालतील, असंही त्यांनी यावेळी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

न्यायालयाने दोषीला 5.1 लाखाचा दंडही ठोठावला आहे. तर घटनेच्या वेळी 15 वर्षांचे असलेल्या अल्पवयीन पीडिताला 4 लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला दिले असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले आहे.(Latest Marathi News)

फिर्यादीनुसार, दोषी हा पीडितेच्या वडिलांच्या मोठ्या भावाचा मुलगा होता आणि तो तिला तिच्या शाळेत घेऊन जायचा आणि तिला तिच्या आजीकडे परत आणायचा. पीडितेने बालकल्याण समितीच्या देखरेखीखाली मुलाला जन्म दिल्याचे वकिलाने सांगितले आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Fee: 'यूपीआय'वरील शुल्कावरुन होणाऱ्या आरोपांना सरकारचं स्पष्टीकरण; 95 टक्के व्यवहार मोफतच...

Prataprao Pawar : कृषी, शिक्षणातील समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

Harry Brook Record: इंग्लंडच्या कर्णधार हॅरी ब्रूकने रचला इतिहास, T20 वर्ल्ड कप विजेत्या कर्णधार रोहित शर्मालाही हे जमलं नाही

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT