elephant 
देश

केरळमधील हत्तीणीचा मृत्यू की हत्या? शवविच्छेदन अहवालातून समोर आलं 'हे' कारण 

सकाळ वृत्तसेवा

कोच्चि, ता. 04 : केरळमधील पलक्कड जिल्ह्यात गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने केरळ सरकारकडे अहवाल मागितला होता. आता हत्तीणीचा शवविच्छेदन अहवालसुद्धा आला आहे. यामध्ये हत्तीणीच्या मृत्यूचे कारण फुफ्फुसात पाणी भरल्यानं झाल्याचं सांगण्यात आलं आहे. 

हत्तीणीच्या शवविच्छेदन अहवालावरून ती गर्भवती होती हे समोर आलं आहे. पाण्यात बुडाल्याने तिच्या शरीरात पाणी गेलं होतं. यामुळे फुफ्फुस काम करणं थांबलं होतं. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं हेच कारण देण्यात आलं आहे. वन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, फटाके घालून दिलेल्या अननसाचा स्फोट झाल्यानं हत्तीणीचा जबडा तुटला होता. आणि त्यानंतर तिला काहीही खाता येत नव्हतं. जखमी अवस्थेत ती नदीच्या पाण्यात उभा राहिली होती. तिथेच तिने प्राण सोडले. 
वन विभागाने म्हटलं की, तपासात महत्वाची माहिती मिळाली आहे.

मृत्यूच्या चौकशीसाठी स्पेशल समिती स्थापन केली असून त्यांनी काही संशयितांची कसून चौकशी केली आहे. सायलंट व्हॅली जंगलात हत्तीणीने फटाके भरलेलं अननस खाल्लं होतं. त्याचा स्फोट तोंडातच झाला आणि त्यानंतर एक आठवड्याने 27 मे रोजी हत्तीणीचा मृत्यू झाला होता. 

दरम्यान, हत्तीणीच्या मृत्यूला निर्दयी हत्या असल्याचे म्हणत गोरखपूरचे भाजप खासदार रवि किशन यांनी दोषींना फाशी देण्याची मागणी केली. दुसरीकडे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितलं की, या प्रकरणी तीन संशयितांची चौकशी सुरू आङे. पोलिस आणि वन विभाग याची चौकशी करेल. आम्ही दोषींना शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: पर्यटकांचा हिरमोड! देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हिणी घाट बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय

काय सांगता? यंदाच्या मान्सूनमध्ये चक्क 'ब्लॅक कार्बन'? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

Pune Property Tax : पुणे महापालिकेची विक्रमी मिळकतकर वसुली: पहिल्या तिमाहीत १३९५ कोटी, गेल्या वर्षीपेक्षा १०२ कोटींची वाढ

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

SCROLL FOR NEXT