Liquor flows from kitchen taps people approaches authorities
Liquor flows from kitchen taps people approaches authorities 
देश

अजबच!!! किचनच्या नळातून पाण्याऐवजी वाईन आली अन्....

सकाळ वृत्तसेवा

केरळः आपण अनेक वेळा चित्रपटात मद्यपींचे पाण्याच्या टाकीत पाणीऐवजी दारू भरण्याचे संवाद ऐकले असतील.पण केरळ येथील त्रिशूर जिल्ह्यात असाच एक प्रसंग घडला आहे. येथील नागरिकांच्या घरात अचानक किचनच्या नळाला पाण्याऐवजी चक्क दारूच येऊ लागली.

चलाकुडी भागातील सोलोमन एवेन्यू अपार्टमेंटमध्ये राहण्याऱ्या रहिवाश्यांना नळातून दारू येत असल्याचे कळल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला. नळातून पाण्याऐवजी वेगळ्याच प्रकारचं पाणी येत होतं, त्याला विचित्रच वास येत असल्याचे कळताच पाण्याच्या टाकीत दारू मिसळली असल्याचा सर्वांचा समज झाला. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली.

येथील नागरिकांनी ही बाब नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यावर याचे सत्य बाहेर आले. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी 4500 लीटर दारू जप्त केली होती. ती त्यांनी एका खड्ड्यात फेकून दिली. पण त्यांना या गोष्टीचा अंदाजही आला नाही की ती दारू वाहत शेजारील विहीरत जाऊन मिळेल. जे की येथील लोकांचा पाण्याचा मूख्य स्त्रोत आहे.

पाण्याच्या रंगामुळे आला संशय

येथील रहिवाशी जोशी मलियेक्कल यांना पाण्याच्या रंगात काही तरी गडबड असल्याचे दिसले. तसेच त्याचा वासही विचीत्र येत होता. पण थोड्याच वेळात त्यांचा संशय खरा ठरला. पाण्यात दारूच मिसळली असल्याचे त्यांना समजले.

चालकुडी महानगरपालिकेला माहिती देण्यात आली

जोशी यांनी सांगितले की परिसरातील अनेक कुटुंबांना असाच काहीसा अनुभव आला. त्यांनी यासंदर्भातील माहिती नगर विकास विभागाला दिली आहे. वॉर्ड काउंसलर वीजे जोजी यांनी पाण्याचा पर्यायी व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Mother's Day 2024: 'मदर्स डे' निमित्त आईसोबत करा दक्षिण भारतातील 'या' सुंदर ठिकाणांची भटकंती

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

SCROLL FOR NEXT