Kerala gold smuggling case Pinarayi Vijayan inquiry from the ED after Swapna Suresh allegation Thiruvananthapuram sakal
देश

केरळ सोने तस्करी प्रकरण : मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची ‘ईडी’कडून चौकशी होणार?

स्वप्ना सुरेश हिच्या आरोपानंतर राज्यात विरोधकांकडून निषेध

अजय कुमार

तिरुअनंतपुरम : केरळमधील सोने तस्करीत मुख्यमंत्री पिनराई विजयन व त्यांच्या कुटुंबाचा २०१६ पासून सहभाग असल्याचा गंभीर आरोप या प्रकरणातील मुख्य आरोपी व माजी वाणिज्य दूतावास सचिव स्वप्ना सुरेश हिने केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

हे प्रकरण पुराव्यांअभावी प्रलंबित आहे. विजयन हे २०१६ रोजी दुबई दौऱ्यावर असताना त्यांना पैशांनी भरलेली बॅग पाठविली होती आणि त्यासाठी राजनैतिक संबंधाचा वापर करण्यात आला होता, असा आरोप स्वप्ना हिने करीत त्या व्यवहारांची सर्व माहिती तिने दिली आहे.

पैशाच्या बॅगेच्या बदल्यात तिरुअनंतपुरममधील वाणिज्य दूतावासाने मुख्यमंत्र्यांच्या ‘क्लिफ हाउस’ या शासकीय निवासस्थानी डबे पाठविले पाठविले होते. त्यात बिर्याणी असल्याचे सांगण्यात आले होते. पण त्या ६०० किलो सोने होते, असा जबाब तिने दिलेला आहे. पल्लकड येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत स्वप्ना म्हणाली, ‘‘ राज्यात कोणाची सत्ता आहे, याची मला फिकीर नाही. विजयन, त्यांची पत्नी कमला, मुलगी वीणा, माजी मंत्री के.टी. जलील, खासगी सचिव शिवकुमार, मुख्य सचिव नलिनी नेटो यांचा सोने तस्करीत २०१६ सहभाग असल्याचे मी न्यायालयासमोर १६४ वेळा दिलेल्या जबानीत सांगितले आहे. यामागे माझा कोणताही राजकीय हेतू नसून सत्य उघड केले आहे.’’ पत्रकार परिषदेनंतर काही अनोळखी व्यक्तींनी स्वप्ना सुरेश हिच्या घरातून सरित यांचे अपहरण केले. सोने तस्करीत मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करण्यामागे कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्यांना नेल्याचे नंतर समजले.

‘सीएमओच्या धमक्या’

‘‘मुख्यमंत्री कार्यालयाकडून (सीएमओ) ा कुटुंबाला धमक्या मिळत आहेत. माझा छळ करण्याच्या उद्देशाने संयुक्त अरब अमिरातीमधील वाणिज्य दूतावासातील जनसंपर्क अधिकारी व माझे सहकारी सरित यांचे अपहरण पोलिसांनी केले,’’ असा आरोप स्वप्नाने केला आहे.

सत्य समजायला हवे

केरळच्या जनतेने त्यांना मुख्यमंत्री बनविले आहे. लोकांना सत्य समजायला हवे. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव शिवशंकर यांना या प्रकरणात कमिशन मिळाले होते, पण त्यांना ताब्यात का घेतले नाही?, असा सवाल स्वप्ना सुरेश हिने केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

Latest Marathi News Updates : वंजारा-बंजारा एक आहे, या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

SCROLL FOR NEXT