केरळच्या राज्यपालांचा रस्त्यावरच ठिय्या Sakal
देश

Kerala News : केरळच्या राज्यपालांचा रस्त्यावरच ठिय्या; ‘एसएफआय’च्या आंदोलनावर खान यांचा संताप

केरळचे राज्यपाल आरिफ मोहंमद खान यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’च्या (एसएफआय) कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर उतरून काळे झेंडे हाती घेत आंदोलन केले.

सकाळ वृत्तसेवा

कोलाम (केरळ) : केरळचे राज्यपाल आरिफ मोहंमद खान यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’च्या (एसएफआय) कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर उतरून काळे झेंडे हाती घेत आंदोलन केले. यावर संतापलेल्या राज्यपालांनी गाडीतून उतरून रस्त्यावर ठिय्या दिला.

मुख्यमंत्री पी. विजयन हे राज्यामध्ये जाणीवपूर्वक अराजकता निर्माण करत असल्याचा घणाघाती आरोप राज्यपालांनी माध्यमांशी बोलताना केला. या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यपाल खान यांना तातडीने ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याचे निर्देश दिले आहेत.

आता राज्यपालांच्या सुरक्षा ताफ्यामध्ये ‘सीआरपीएफ’च्या जवानांचा देखील समावेश असेल. राज्यपालांनी मात्र आपण आंदोलन केलेले नसून पोलिसांनी ‘एसएफआय’च्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेल्या ‘एफआयआर’ची प्रत मिळण्यासाठी मी तिथे थांबलो होतो, अशी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली.

राजधानी तिरुअनंतपुरमपासून ४० किलोमीटर अंतरावर निलामेल येथे हे नाराजीनाट्य घडले. तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर खान हे ‘एफआयआर’ची प्रत घेऊन मार्गस्थ झाले.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना खान म्हणाले, ‘‘ राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांनाच पोलिस संरक्षण देण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये होते आहे. ‘एसएफआय’च्या प्रदेशाध्यक्षांविरोधातच अनेक खटले न्यायालयामध्ये दाखल झाले आहेत.’’

यावेळी राज्यपालांचा पोलिसांशी देखील वाद झाला. तुम्ही तातडीने पोलिस आयुक्तांना फोन करा अन्यथा मी थेट पंतप्रधान कार्यालयाशी संवाद साधतो, अशी धमकीच राज्यपालांनी पोलिसांना दिली होती.

मुख्यमंत्री आगीशी खेळत आहेत

राज्यपालांच्या भूमिकेबाबत भाष्य करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री व्ही. मुरलीधरन म्हणाले, ‘‘ राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेच गृहविभागाचा अतिरिक्त कार्यभार असून त्यांना त्यांची घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यात अपयश आले आहे.

राज्यपाल अशा प्रकारच्या कारवायांना भीक घालणार नाहीत, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यायला हवे. मुख्यमंत्री हे आगीशी खेळत आहेत. या आंदोलनाच्यास्थळी माध्यमे उपस्थित असतील तर या आंदोलनाची राज्य गुप्तवार्ता विभागाला माहिती होती हे स्पष्टपणे दिसून येते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

SCROLL FOR NEXT