देश

इतरांचे प्राण वाचविणारा 'तो' गेला मदतीच्या प्रतीक्षेतच ..!

वृत्तसंस्था

तिरूअनंतपुरम : केरळातील मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच अनेकांचा यामध्ये मृत्यू झाला. या पुरामध्ये अडकलेल्या अनेकांना वाचवणाऱ्या 'धाडसी' तरुणाचा अपघात झाला. अपघातानंतर त्याने मदतीसाठी खूप याचना केली. मात्र, त्याच्या मदतीसाठी कोणीही आले नाही. अखेर त्याचा उपचारांअभावी मृत्यू झाला. 

केरळमधील आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेकजण बेघर झाले तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. यातील बाधितांच्या बचावासाठी देशभरातून 'मदतीचा हात' देण्यात येत आहे. असे असताना येथील रहिवासी असलेल्या 24 वर्षीय जिनेश जेरोनने आपला जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी जिनेश आपल्या दुचाकीवरून जात असता त्याला भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यावेळी त्याने मदतीसाठी याचना केली. मात्र, त्याच्या मदतीसाठी कोणीही आले नाही. परिणामी उपचारांअभावी त्याचा मृत्यू झाला. 

जिनेशच्या अपघाताची माहिती त्याच्या दुचाकीच्या मागे बसलेल्या त्याचा मित्र जगनने दिली. जगन म्हणाला, ''जेव्हा दुचाकीला ट्रकने धडक दिली. तेव्हा मी एका ठिकाणी फेकला गेलो. जिनेश ट्रक खाली आला आणि त्याला ट्रकने चिरडले. या अपघातानंतर जिनेश मदतीसाठी याचना करत होता. मात्र, त्याच्या मदतीसाठी कोणीही आले नाही. या घटनेच्या अर्ध्या तासानंतर रुग्णवाहिका आली. मात्र, त्यापूर्वीच तो मृत झाल्याचे सांगण्यात आले''. 

दरम्यान, केरळच्या पुरात अनेकांचे जीव वाचविणाऱ्या जिनेशच्या मदतीसाठी कोणीही आले नसल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT