kerala high court (Representative photo) 
देश

मुलाचे नाव ठेवण्यावरून आई-वडिलांमध्ये भांडण, प्रकरण थेट कोर्टात! अखेर हायकोर्टाने ठेवलं नाव

Sandip Kapde

केरळ हायकोर्टाने आई-वडिलांची भूमिका पार पाडली आहे. मुलाचे नाव ठेवण्यावरुन आई-वडिलांमध्ये जोरदार भांडण सुरू होते. यामुळे केरळ हायकोर्टाने एका लहान मुलाचे नाव ठेवले. मुलाच्या कल्याणासाठी त्याचे नाव असणे अत्यंत आवश्यक आहे, असे कोर्टाने म्हटले आहे. विशेष म्हणजे मुलाचे नाव ठेवण्याच्या प्रक्रियेत न्यायालयाने आई-वडिलांची शिफारसही मान्य केली आहे.

काय आहे प्रकरण?

केरळमध्ये मुलाचे नाव ठेवण्यावरुन पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. मात्र जेव्हा मुलाला शाळेत टाकण्याची वेळ आली तेव्हा हे प्रकरण उघडीस आले. शाळेने मुलाला नाव नसल्यामुळे शाळेत नाव दाखल करण्यास नकार दिला. यावेळी आई आणि वडील दोघांनीही वेगळेवगळे नाव सुचवले. परिणामी दोघांमध्ये वाद झाला आणि यामध्ये कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला. (Latest Marathi News)

कोर्टात काय घडलं?

पालकांमध्ये सुरू असलेला वाद मिटवण्यास वेळ लागेल आणि हे मुलासाठी चांगले नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले. कोर्टाने मुलाचे नाव ठेवण्याचा पालकांच्या अधिकाराचा वापर केला आणि या अधिकाराचा वापर करताना पालकांच्या हक्कांपेक्षा मुलाचे कल्याण महत्त्वाचे असल्याचे म्हटले.

कोर्टाला मुलाचे नाव निवडावे लागले. नाव निवडताना मुलाचे कल्याण, सांस्कृतिक कल्पना, पालकांचे हित या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. मुलाचे कल्याण हे त्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट आहे. अशा परिस्थितीत, कोर्टाला पॅरन्स पॅट्रिए अधिकार क्षेत्र (parens patriae jurisdiction) वापरण्यापासून दुसरा पर्याय नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले.

पालकांकडून वेगवेगळ्या सूचना -

आईला मुलाचे नाव 'पुण्य नायर' ठेवायचे होते. यासाठी त्यांनी रजिस्ट्रार यांच्याकडे संपर्क साधला, मात्र रजिस्ट्रार यांनी दोन्ही पालकांच्या उपस्थितीची मागणी केली. मात्र वेगळे झालेल्या पालकांचे या विषयावर एकमत होऊ शकले नाही. येथे वडिलांची इच्छा होती की मुलाचे नाव 'पद्मा नायर' ठेवावे. त्यामुळे अनेक बाबी लक्षात घेऊन न्यायालयाने मुलाचे नाव 'पुण्य बालगंगाधरन नायर' किंवा 'पुण्य बी. नायर ठेवण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT