Crime News Esakal
देश

Crime News: सीटवरुन वाद, धावत्या रेल्वेत महिलेला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, 8 प्रवासी होरपळले

सीट पकडण्यावरुन झालेल्या वादावादीनंतर आरोपीने थेट रेल्वेचा डब्बाच पेटवून दिल्याची घटना घडली

अंकिता खाणे (Ankita Khane)

केरळमध्ये धावत्या ट्रेनमधील एक थरारक घटना समोर आली आहे. कोझिकोड जिल्ह्यातील इलाथूर येथील एका अज्ञात व्यक्तीने सहप्रवाशाच्या अंगावर पेट्रोल टाकून चालत्या ट्रेनमध्येच पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये एका माय-लेकाचा समावेश आहे. एलाथुर येथील रेल्वे रुळांजवळ दोन मृतदेह सापडले असून या घटनेत आठ जण गंभीर जखमी आहेत.

घटनेमध्ये जखमी झालेल्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर, आठपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अलप्पुझा-कन्नूर मुख्य कार्यकारी एक्स्प्रेसच्या डी१ डब्ब्यात रात्री १०च्या सुमारास ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोझिकोड येथे रविवारी अलप्पुझा - कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेसमध्ये बसण्याच्या जागेवरुन दोन प्रवाशांमध्ये जोरदार भांडण झालं. वाद इतका विकोपाला गेला की एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाला पेटवून दिलं. पेटवून दिलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

दरम्यान या अपघातात आठ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र ट्रेन ज्यावेळी कन्नूर स्टेशनवर पोहोचली तेव्हा प्रवाशांनी सांगितलं की घटनेनंतर एक महिला आणि एक मुलगा बेपत्ता आहे. त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध सुरु केला. तब्बल चार तासांच्या शोध मोहिमेनंतर दोघांचे मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळुन आले आहेत.

ट्रेनमध्ये सुरु असलेल्या वादानंतर काही प्रवाशांनी इमर्जन्सी चैन ओढली. चेन ओढल्यानंतर ट्रेनचा स्पीड कमी झाला. त्यावेळी आरोपीने हीच संधी साधत रेल्वेतून उडी मारून पळ काढला. आरोपीची ओळख पटू शकली नाही. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

HSC Exam Paper Leak : केमिस्ट्री, फिजीक्सनंतर बारावीचा गणिताचा पेपर फुटला; नागपुरात घडला प्रकार, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?

Medha Mankumre Point Accident : मेढ्यातील मानकुमरे पॉइंटजवळ उलटली कार; पाचवड-खेड हायवेवर नेमकं काय घडतंय? ठेकेदाराच्या 'या' चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!

Marathi Bhasha Gaurav Din: 27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

SCROLL FOR NEXT