elephant 
देश

धक्कादायक! एक महिन्यापूर्वी देखील हत्तीणीसोबत निर्दयी वागणूक

सकाळ वृत्तसेवा

कोल्लम, ता. 03 : केरळमध्ये एका हत्तीणीला फटाके भरलेलं अननस खायला घातल्यानं ती गंभीर जखमी झाली होती. यामुळे हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर या प्रकाराची सर्वत्र निंदा केली जात आहे. दरम्यान, असाच एक प्रकार महिन्याभरापूर्वी कोल्लम जिल्ह्यात घडल्याची माहिती समोर येत आहे. एक महिन्याआधी एका हत्तीणीच्या तोंडात जखम झाल्याने तिचा मृत्यू झाला होता. एका अधिकाऱ्याने सांगितले की, एप्रिल महिन्यात कोल्लम जिल्ह्यातील पुनलूर विभागातील फॉरेस्ट रेंजमध्ये एका हत्तीणीचा जबडा तुटला होता. तिला काही खाताही येत नव्हतं.

वन अधिकाऱ्याने सांगितलं की, हत्तीणी तिच्या कळपातून चुकली होती. तिचा जबडा तुटलेला दिसत होता तसंच तिला काही खाताही येत नव्हतं. हत्तीण अशक्त झाली होती. जेव्हा वन अधिकारी तिच्याजवळ गेले तेव्हा ती जंगलात पळून जात कळपात शिरली. त्यानंतर पुन्हा ती कळपातून बाजूला दिसली. तेव्हा तिच्यावर उपचार केले मात्र तिला वाचवता आले नाही.

भारत-बांगलादेश सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के

हत्तीणीच्या मृत्यूची चौकशी कऱणं आणि यामागचे कारण शोधणं कठीण असल्याचं दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. कोणीतरी तिच्या खाण्यात फटाके घातल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यामुळेच तिचा जखम झाली असावी असं अधिकाऱ्याने म्हटलं आहे. शवविच्छेदनाचा अहवाल यायचा आहे. मात्र अशा प्रकऱणाचा तपास करणं कठीण काम आहे. एका दिवसात प्राणी बराच प्रवास करतात त्यामुळे नेमकं कधी आणि कुठे हा प्रकार घडला याचा शोध घेताना अनेक अडचणी येत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

केरळच्या वन मंत्र्यांनी सांगितले की, वरिष्ठ वन अधिकाऱ्यांकडून सायलेंट व्हॅलीमधील हत्तीणीच्या मृत्यबाबत अहवाल मागितला आहे. वन संरक्षण मुख्य सचिव सुरेंद्र कुमार यांनी अशी माहिती दिली की, अट्टापडी इथं ही घटना घडली आणि मृत्यू वेलियार नदीत 27 मे रोजी झाला. या प्रकरणात दोषी असलेल्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निलांबूरचे वन अधिकारी मोहन कृष्णा यांनी फेसबुकवर केलेल्या भावनिक पोस्टनंतर या घटनेची माहिती जगासमोर आली. त्यांनी वेलियार नदीत झालेल्या हत्तीणीच्या मृत्यूनंतर एक पोस्ट लिहिली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT