देश

माणुसकी! कोविड ड्युटी करताना 'ते' भरतात मुक्या जनावरांचं पोट

पूर्वी हॉटेल किंवा रेस्टॉरंटवरील शिल्लक अन्नपदार्थ भटक्या जनावरांना दिलं जात होतं. मात्र..

शर्वरी जोशी

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपामुळे सध्या अनेक ठिकाणी लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या काळात लहान व्यवसायांपासून ते मोठ्या उद्योग व्यवसायांपर्यंत सारं काही बंद आहे. परिणामी, खानावळ, हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबेदेखील बंद आहे. त्यामुळे सामान्यांप्रमाणेच मुक्या जनावरांवरदेखील उपासमारीची वेळ येत आहे. पूर्वी हॉटेल किंवा रेस्टॉरंटवरील शिल्लक अन्नपदार्थ भटक्या जनावरांना दिलं जात होतं. मात्र, आता सारं काही बंद असल्यामुळे या मुक्या जनावरांवर उपासमारीची वेळ आली. परंतु, या मुक्या जनावरांसाठी केरळचे सब इंस्पेक्टर सुब्रमण्यम पोट्टी एस देवमाणूस ठरत आहेत. कोरोना काळात आपली ड्युटी बजावत असतांना ते या मुक्या जनावरांच्या जेवणाचीही सोय करत आहेत. (kerala policemen feed stray dogs amid lockdown)

सोशल मीडियावर सुब्रमण्यम पोट्टी एस या पोलिसांची चर्चा रंगली आहे. ते नेमोम पोलिस स्टेशनचे सब इंस्पेक्टर असून सध्या वेल्लायनई लेक येथे कोरोना ड्युटी बजावत आहे. विशेष म्हणजे या काळात आसपासच्या परिसरात असलेल्या भटक्या जनावरांना ते दररोज अन्नदेखील देत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा हा नित्य उपक्रम झाला आहे.

मागील दोन महिन्यांपासून सुब्रमण्यम पोट्टी एस हे मुक्या प्राण्यांना अन्न देत आहेत. तसंच प्राण्यांना अन्न दिल्यानंतर तो परिसरदेखील ते स्वत: स्वच्छ करत आहेत.

"एकदा रात्री दीड वाजता पेट्रोलिंग करत असतांना माझ्या जवळ दोन श्वान आले. पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. त्यांच्या शरीरावर जराही मांस दिसत नव्हतं. केवळ हाडे दिसत होती. त्यांची ही अवस्था पाहून मी अत्यंत बेचैन झालो आणि तेव्हापासून मी त्यांनी दररोज खायला घालण्यास सुरुवात केली. ज्यावेळी मी ड्युटीवर असतो त्यावेळी एकही मुका जीव उपाशी राहणार नाही याकडे मी लक्ष देत असतो", असं सुब्रमण्यम पोट्टी एस यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणतात, "मी शाकाहारी आहे. त्यामुळे आमच्या घरा मांसाहार करत नाहीत. म्हणून मग मी दररोज दुकानातून त्यांच्यासाठी डोसा, पराठा किंवा चिकन वगैरे खरेदी करतो. मी सुट्टीवर असेन तर माझे सहकारी या प्राण्यांना खाऊ घालतात."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT