देश

Kerala Rain - भूस्खलनासह वेगवेगळ्या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

केरळचे मुख्यमंत्री पीनाराई विजयन यांनी तात्काळ बैठक बोलावली आहे. त्यांनी या संकटात भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांची मदत मागितली आहे.

केरळच्या दक्षिण आणि मध्य भागात पावसाने थैमान घातलं आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती असून भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत. आतापर्यंत यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोट्टयम आणि इडुक्कीच्या पर्वतीय भागात भूस्खलन झाल्यानं २२ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. सरकारने या आपत्तीत सशस्त्र दलाची मदत घेतली आहे. ११ एनडीआरएफ पथके, दोन लष्करी आणि दोन डीएससी पथकांसह केंद्रीय पथकांकडून बचावकार्य सुरु आहे.

राज्यात अतिवृष्टी सुरु असून इडुक्कीमध्ये पाण्याच्या प्रवाहात एक कार वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये गाडीतील दोघांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आणि मध्य भागात ११ पथके तैनात करण्यात आली आहेत.

कोट्टायम जिल्ह्यातही अतिवृष्टी सुरु आहे. जिल्ह्यातील कूट्टीक्कल इथं भूस्खलन झाले असून आणखी तीन मृतदेह सापडले आहेत. या दुर्घटनेत मृतांची संख्या ९ वर पोहोचली आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफच्या पथकासह इतर बचावपथके कार्यरत आहेत.

केरळचे मुख्यमंत्री पीनाराई विजयन यांनी तात्काळ बैठक बोलावली आहे. त्यांनी या संकटात भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांची मदत मागितली आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, धरणांच्या पाणी पातळीकडे आमचे लक्ष आहे. अतिवृष्टीमुळे कोट्टयम, पथानामथिट्टा आणि इडुक्कीला मोठा फटका बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT