Kerala famous snake rescuer Vava Suresh
Kerala famous snake rescuer Vava Suresh esakal
देश

Vava Suresh : 50 हजार साप पकडणाऱ्या सुरेशच्या तब्येतीत सुधारणा

सकाळ डिजिटल टीम

सुरेशच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागानं विशेष वैद्यकीय पथक स्थापन केलंय.

दक्षिण भारतातील (South India) सर्वात प्रसिद्ध 'स्नॅक कॅचर' वावा सुरेश (Vava Suresh) याला दोन दिवसांपूर्वी नागानं (Cobra) दंश केला होता. त्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक झाली होती. सुरेशला कोट्टायम मेडिकल कॉलेजमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, जीवनाशी लढा देणाऱ्या सुरेशला आता व्हेंटिलेटरवरून काढण्यात आलंय. कोट्टायम मेडिकल कॉलेजचे (Kottayam Medical College) अधीक्षक टी. के. जयकुमार (T. K. Jayakumar) यांनी सांगितलं की, सुरेशनं स्वतःहून श्वास घेण्यास सुरुवात केलीय. त्याच्या तब्येतीत थोडी सुधारणा झालीय. सुरेशला आणखी दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

सुरेशच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागानं विशेष वैद्यकीय पथक स्थापन केलंय. साप चावल्यानंतर सुरेशला केरळ महामंडळ आणि मंत्री व्हीएन वासवन (Minister VN Vasavan) यांनी त्याच्यासाठी सर्व वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. सुरेशनं आतापर्यंत 50,000 हून अधिक साप पकडले आहेत. त्यानं नॅशनल जिओग्राफिक आणि अॅनिमल प्लॅनेट चॅनेलमध्येही काम केलंय.

याआधीही सुरेशला अनेकदा सापानं दंश केलाय. पण, प्रत्येक वेळी त्यानं मृत्यूला हरवलंय. सुरेशला दोनदा व्हेंटिलेटरवरही (Ventilator) ठेवण्यात आलं होतं. दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध स्नॅक कॅचर म्हणून सुरेशला ओळखलं जातं. केरळ हे विशेषत: सापांच्या 110 प्रजातींचं घर म्हणूनही ओळखलं जातं. सुरेश यानं जवळपास सर्व प्रजातींचे साप पकडले आहेत. मानवी वस्तीतील सापांना वाचवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळमधील सर्पमित्र वावा सुरेशला सोमवारी नागानं दंश केला. त्याची प्रकृती चिंताजनक होती. कोट्टायमच्या (Kottayam Kerala) कुरिचीमध्ये सुरेश कोब्रा पकडण्याचा प्रयत्न करत असताना, त्याच्या उजव्या पायाला सापानं दंश केला होता. त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होती असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Vilasrao Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावूक; शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT