Kesh King Success Story: देशात असे अनेक ब्रँड आहेत ज्यांनी आयुर्वेदिक उत्पादने बाजारात आणली आणि ती लोकांची गरज बनली. डॉ. अर्थॉ, पेट सफा, रूप मंत्रा, सच्ची सहेली आणि केश किंग ही अशी उत्पादने आहेत जी घरोघरी नावारूपास आली आहेत. अशी अर्धा डझनहून अधिक उत्पादने बाजारात आणण्याचे श्रेय उद्योजक संजीव जुनेजा यांना जातं.
विशेष म्हणजे भारतातील अनेक ब्रँड्सना या उत्पादनांना उंचीवर नेण्यासाठी बराच वेळ लागला परंतु संजीव जुनेजा यांनी 4 ते 5 वर्षात ते करून दाखवलं आणि SBS ग्रुप ऑफ कंपनीजला उंचीवर नेलं.
संजीवचे आई-वडील अंबाला, हरियाणात आयुर्वेदिक डॉक्टर होते. यामुळेच संजीव यांचे बालपण घरीच औषधोपचारात गेले. त्यांना आयुर्वेदिक औषधांचं उत्तम ज्ञान होतं. ही माहितीच काहीतरी नवीन करण्यासाठी बूस्टर ठरली.
वडिलांच्या मृत्यूनंतर घेतलेला निर्णय
1999 मध्ये वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. औषधांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी आईकडून दोन हजार रुपये उसने घेतले. काही वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आणि संशोधनानंतर 2003 मध्ये त्यांनी कंपनी सुरू केली आणि रॉयल कॅप्सूल बनवून बाजारात आणली. बाजारात त्याची मागणी वाढली. पुरवठा वाढला की नफा वाढू लागला. नफ्यातून येणारे पैसे पुन्हा गुंतवायला सुरुवात केली. त्यामुळे बँकेकडून कर्ज घेण्याची गरजच उरली नाही.
पहिली कॅप्सूल विकणं सोपं नव्हतं
संजीव सांगतात की, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा रॉयल कॅप्सूल बनवली तेव्हा ती मार्केटमध्ये विकण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये पोहोचले.
पण कोणते कोणते डॉक्टर ही गोळी लिहून देतात असं त्यांना विचारलं. एवढेच नव्हे तर मेडिकल स्टोअर्सवर कॅप्सूलच्या विक्रीसाठीही ग्राहकांची मागणी आवश्यक होती. इथून त्यांना एक गोष्ट समजली की, कोणतेही उत्पादन उंचीवर नेण्यासाठी ग्राहकांमध्ये एक ओळख असणे आवश्यक आहे.
वृत्तपत्रातून लोकांपर्यंत उत्पादने दिली जातात
उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी दोन गोष्टींवर काम केलं. प्रथम आपल्या उत्पादनांचं नाव आणि त्याची टॅग लाईन अशा प्रकारे ठेवली की लोकांना ती सहज समजेल. जसं की केश किंग, डॉ. आर्थों टॅगलाइन ठेवली, अब दर्द भी घुटने टेकेगा.
आपल्या ब्रँडला प्रसिद्धी देण्यासाठी सेलिब्रिटींना याची जाहिरात करायला लावली. दुसरं म्हणजे उत्पादनाशी संबंधित जाहिराती थेट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वृत्तपत्राचे माध्यम निवडलं.
पहिले प्रमुख उत्पादन केश किंग ?
47 वर्षीय संजीव सांगतात की, मोकळेपणाने काम करा, आर्थिक उद्दिष्टे साध्य करा आणि कुटुंबालाही वेळ द्या. त्यांची सर्व उत्पादन श्रेणी एकाच वेळी सादर करू नये हे त्यांचे तत्वज्ञान आहे. उत्पादनाच्या सुरुवातीच्या यशानंतरच दुसरं उत्पादन लाँच करा.
त्यांचे पहिलं प्रमुख उत्पादन केश किंग होतं. केसांबद्दल भारतीयांना विशेष प्रेम असल्याचं त्यांना जाणवलं. त्यामुळेच केश किंग बाजारात आपलं स्थान निर्माण करू शकली. मात्र, नंतर ती प्रसिद्ध कंपनी इमामीला विकण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.