Digvijay Singh esakal
देश

माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्याविरुध्द गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

भाजप कार्यकर्त्यांनी भोपाळमधील गुन्हे शाखा गाठून दिग्विजय सिंह यांच्याविरोधात तक्रार केलीय.

भोपाळ : माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांच्या खरगोन हिंसाचाराच्या (Khargone Violence) ट्विटवर भोपाळ गुन्हे शाखेनं (Bhopal Police) त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवलाय. दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध कलम 58/22, 153A(1), 295A, 465 505(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिग्विजय सिंह यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक छायाचित्र पोस्ट करत लिहिलं की, धार्मिक स्थळावर तलवार आणि ध्वज लावणं योग्य आहे का? खरगोन प्रशासनानं परवानगी दिली होती का? पण ते चित्र खरगोन किंवा एमपीचे नसून मुझफ्फरपूरचे (बिहार) होते. ही चूक लक्षात येताच त्यांनी आपली पोस्ट लगेच डिलीट केली. मात्र, या ट्विटनंतर भाजपनं दिग्विजय यांना घेरलंय.

याप्रकरणी आता गुन्हे शाखेनं तपास सुरू केलाय. दिग्विजय सिंह यांच्यावर दोन समुदायांमध्ये धार्मिक उन्माद पसरवणे, बनावट कागदपत्रे वापरणे, सार्वजनिक ठिकाणी अफवा पसरवणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप कार्यकर्त्यांनी भोपाळमधील गुन्हे शाखा गाठून दिग्विजय सिंह यांच्याविरोधात तक्रार केलीय. प्रकाश पांडे यांच्या तक्रारीवरून दिग्विजय सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या या ट्विटवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. ते म्हणाले होते, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना राज्यात उन्माद पसरवायचा आहे. राज्याला दंगलीच्या आगीत ढकलण्याचा त्यांचा डाव आहे. ते खपवून घेतलं जाणार नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटो आणि पोस्टवरून धार्मिक उन्माद पसरवल्याचा आरोप केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT