Parental Control Settings
Parental Control Settings 
देश

Parental Control Settings : मुलांना फोनवर पाहता येणार नाही अ‍ॅडल्ट कंटेंट, 'या' तीन सेटिंग्ज करा ऑन!

Sandip Kapde

Parental Control Settings : आजच्या डिजिटल युगात मोबाईल म्हणजे जिवनातील अविभाज्य भाग झाला आहे. लहान मुलं तर सर्रास मोबाईल वापरतात. यामुळे मुलांच्या आरोग्यावर परीणाम झाल्याचे देखील समोर आले आहे. सर्वांच्या जीवनशैलीत इंटरनेटचा वापर अतिशय सामान्य आणि सोपा झाला आहे.

कोरोना काळात ऑनलाईन क्लासेस असल्यामुळे मुलांमध्ये मोबाईलचा वापर खूप वाढला आहे. इंटरनेटवर सर्व प्रकारची सामग्री उपलब्ध आहे. त्यामुळे मोबाइल असताना अ‍ॅडल्ट कंटेंट पाहण्याचा धोकाही वाढला आहे. मात्र अशा तीन सेटिंग्स आहेत. ज्यामुळे मुलं अ‍ॅडल्ट कंटेंट पाहू शकणार नाहीत. त्या सेटिंग्स समजून घ्या.

Google Play निर्बंध-

Google Play वरील निर्बंधामुळे मुलांना अ‍ॅडल्ट कंटेंट पाहता येणार नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये Google Play Restrictions चालू करावे लागतील. मुलाला त्यांच्या वयासाठी योग्य नसलेली अ‍ॅप्स, गेम्स आणि इतर वेब संसाधने डाउनलोड करण्यापासून प्रतिबंधित करेल.

सर्वप्रथम Google Play Store वर जा. त्यानंतर डाव्या कोपर्‍यात सेटिंग्जमध्ये जा. येथे तुम्हाला 'Parental controls' हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला येथे पिन सेट करण्यास सांगितले जाईल. एकदा पिन सेट केल्यानंतर, तुम्ही प्रत्येक श्रेणीसाठी स्टोअर आधारित वय रेटिंगवर आधारित निर्बंध सेट करू शकता.

क्रोम सेटिंग्स -

Google क्रोम सेटिंग्समध्ये देखील पर्या उपलब्ध आहेत. इंटरनेटवर चुकीचा किंवा घाणेरडा मजकूर पाहण्यापासून मुलांना रोखतात. मुलं Google Chrome वापरून त्यांच्या साठी उपल्बध नसलेल्या गोष्टी पाहू शकणार नाहीत. ही सेटिंग्स सुरू करण्यासाठी प्रथम डिव्हाइसवर Chrome उघडा. त्यानंतर वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. येथे नवीन विंडोमध्ये तुम्हाला सेटिंगचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. यानंतर, Advanced विभागात जाऊन प्रायव्हसीवर जा. येथून सुरक्षित ब्राउझिंग चालू करा.

पेरेन्टल अ‍ॅप्स-

Google Play Store वर अनेक पेरेन्टल अ‍ॅप्स देखील उपलब्ध आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही फोन लहान मुलांसाठी सुरक्षित करू शकता. हे अ‍ॅप्स वेब ब्राउझर, इन्स्टंट मेसेंजर, गेम्स आणि अ‍ॅप्लिकेशन्समधील विविध अ‍ॅडल्ट कंटेंट ब्लॉक करतात. हे अ‍ॅप्स धोकादाय लिंक्सपासून देखील सुरक्षा देते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atala Masjid: भिंतीवर त्रिशूळ, फुले? जौनपूरमधील अटाला मंदीर की मशीद? हिंदुंनी गाठलं कोर्ट, काय आहे संपूर्ण प्रकरण

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT