Kiren Rijiju statement Constitution is supreme in country politics  sakal
देश

Kiren Rijiju : राज्यघटना हीच देशात सर्वोच्च; किरेन रिजीजू

कायदा मंत्री किरेन रिजीजू ; सर्वोच्च न्यायालयावर निशाणा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटना ‘हायजॅक’ केली आहे, या उच्च न्यायालयाच्या एका माजी न्यायाधीशाने व्यक्त केलेल्या मताचे कायदा मंत्री किरेन रिजीजू यांनी आज समर्थन केले.

न्यायाधीश पदावरील नियुक्ती प्रक्रियेवरून केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाचे कॉलेजियम यांच्यात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रिजीजू यांनी एका व्हिडिओ प्रसिद्ध करत भूमिका मांडली आहे.

कायदामंत्री रिजीजू यांनी आज दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर. एस. सोधी यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. ‘न्यायाधीशांची नियुक्ती स्वत:च करण्याचा निर्णय घेत सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटना ‘हायजॅक’ केली आहे. बहुतांश लोकांचे असेच म्हणणे आहे,’ असे मत मांडत असताना न्या. सोधी हे या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

त्यांच्या या भूमिकेचे समर्थन करताना रिजीजू यांनी, ‘खरोखरच अनेक जणांचे असेच मत आहे,’ असे ट्विट केले आहे. ‘‘राज्यघटनेच्या तरतूदींकडे आणि जनतेने दिलेल्या कौलाकडे दुर्लक्ष करणारे काही लोक स्वत:ला राज्यघटनेहून वर मानतात.

जनता ही त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून स्वत:वरच राज्य करत असते. निवडून दिलेले लोक जनतेचे हित लक्षात घेऊन कायदे करतात. आपली न्यायपालिका स्वतंत्र आहे आणि राज्यघटना सर्वोच्च आहे,’’ असे रिजीजू यांनी म्हटले आहे.

कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे, असेही न्या. सोधी यांनी म्हटले आहे. ‘सर्वोच्च न्यायालय कायदे करू शकत नाही. तुम्ही राज्यघटनेत दुरुस्ती करू शकता का? हा अधिकार फक्त संसदेला आहे.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने प्रथमच राज्यघटनेला हायजॅक केले आहे, असे मला वाटते. हायजॅक केल्यानंतर ते म्हणतात की आम्हीच न्यायाधीशांची नियुक्ती करू आणि यामध्ये सरकारची काहीही भूमिका नसेल,’ असे सोधी यांनी मुलाखतीत म्हटले आहे.

उपराष्ट्रपतींचाही न्यायालयाला सवाल

वरीष्ठ न्यायालयांमध्ये न्यायाधीश नियुक्त करण्यासाठीची कॉलेजियम यंत्रणा भारतीय राज्यघटनेसाठी ‘अनोळखी’ असल्याचे कायदा मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटले आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनीही,

राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोग कायदा आणि त्यासंबंधींच्या तरतूदींकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला सवाल विचारला आहे. जनतेचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या संसदेने मंजूर केलेल्या कायद्याकडे सर्वोच्च न्यायालयाकडून दुर्लक्ष होते, असे जगात पूर्वी कधी घडलेले नाही, असे धनकड म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT