Baramati Crime News: : दोन लाख रुपयांची सुपारी, इंदापूरातुन दोघांना अटक; उद्योगपती राणा सूर्यवंशी हल्लाप्रकरणी पोलीस तपासात मोठी माहिती समोर
बारामती विमानतळ परिसरात राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेला हल्लाच्या पोलीस तपासात एक मोठी अपडेट समोर आली आहे. राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. राणा शिपिंग कार्पोरेशनचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास बारामती विमानतळ परिसरात सशस्त्र हल्ला झाला होता.
या प्रकरणी मूळचा सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वीट येथील रहिवाशी असणारा आणि सध्या इंदापूर तालुक्यातील भिगवण मधील थोरातनगरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या ज्ञानदेव महादेव शिंदे याने राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.