Kirron Kher Sakal
देश

Kirron Kher : "मला मतं न देणाऱ्यांना चपलेने मारलं पाहिजे"; भर सभेत किरण खेर यांचं विधान

नऊ वर्षांत किरण खेर पहिल्यांदाच या गावात आल्या आहेत, असं काँग्रेसने सांगितलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

चंदीगडच्या खासदार किरण खेर यांनी असभ्य भाषा वापरल्याने त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. किशनगडमध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी मतदारांविषयी आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यावेळी त्यांनी मतदारांना लाज वाटली पाहिजे, त्यांना चपलेने मारलं पाहिजे, असं विधान केलं आहे.

किरण खेर या चंदीगडमधल्या किशनगड इथं एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. खेर यांच्यासोबत चंदीगडचे महापौर अनुप गुप्ता आणि महापालिका आयुक्त अनिंदिता मित्राही होत्या.

यावेळी दीप कॉम्प्लेक्स भागात बोलताना त्या म्हणाल्या, "जर दीप कॉम्प्लेक्समधल्या एकाही व्यक्तीने मला मत दिलं नाही, तर लाज वाटायला हवा. त्या लोकांना चपलेने मारायला हवं." किशनगडमध्ये पेव्हर ब्लॉकची तरतूद आणि दुरुस्तीसाठी पायाभरणी करण्यासाठी खेर या कार्यक्रमात आल्या होत्या.

या शब्दांचा वापर करून खेर यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्या वक्तव्यावर टीका केली. चंदिगडचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज लुबाना म्हणाले, “किरण खेर किशनगडमध्ये येण्याची नऊ वर्षांत ही पहिलीच वेळ आहे. या नऊ वर्षात एकही विकास काम झाले नाही. आता त्यांना कोणत्याही मार्गाने मतं हवी आहेत. त्यांचा टोन पाहा, त्यांची गुंडगिरी पाहा.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET paper leak: 'नीट' परीक्षेच्या प्रश्नपत्रिका NTAच्या तज्ज्ञांनीच फोडल्याचा सीबीआयचा निष्कर्ष? 'सप्लाय चेन'बाबत तपासात धक्कादायक माहिती

Vanrang 2026: दुर्गम भागातील आदिवासी कलांना मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी मानाचं व्यासपीठ! 'वनरंग 2026'ला सुरुवात

Marathi News Live Updates : शेतातील झोपडीत रंगला जुगाराचा अड्डा, गुन्हे शाखेच्या छापा, नऊ जण ताब्यात

Kalamb Drugs Racket : कळंबच्या ड्रग्ज रॅकेटचा ‘किंगपिन’ कोण?; बीड-पुणे कनेक्शन पोलीस तपासात उघड, पुरवठादार, विक्रेते आणि सेवन करणारे पोलिसांच्या रडारवर

Pune Airport : सुरक्षित उड्डाणांसाठी ‘घार’ ठरतेय सर्वात मोठा अडथळा; हवाई दलाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग

SCROLL FOR NEXT