know how the presidential election Selection process
know how the presidential election Selection process sakal
देश

Presidential Election 2022 : मतदार कोण, मतांचे मूल्य कसे ठरते?

सकाळ वृत्तसेवा

Here Is How India Will Elect President

देशात आज राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होत आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीच्या प्रमुखपदी कोण विराजमान होतो, हा औत्सुक्याचा विषय आहे. मात्र त्याची निवड प्रक्रिया क्लिष्ट आहे. ही निवडणूक थेट जनतेतून न होता जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत होते. त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेचा थोडक्यात आढावा..

आमदारांच्या मतांचे मूल्य (Value of the vote of MLA)

राज्याची एकूण लोकसंख्या भागिले राज्यातील एकूण आमदारांची संख्या भागिले १००० या सूत्राने येणारी संख्या ही त्या आमदाराच्या मताचे मूल्य ठरते. समजा, एखाद्या राज्याची लोकसंख्या पाच कोटी आहे आणि राज्यातील एकूण आमदारांची संख्या २५० आहे तर ५००००००० / २५०/१००० = २०० इतके त्या राज्यातील एका आमदाराच्या मताचे मूल्य गृहीत धरले जाते.

खासदारांच्या मतांचे मूल्य (Value of the vote of MP)

देशातील सर्व आमदारांच्या मतांचे मूल्य भागिले एकूण खासदारांची संख्या (राज्यसभा आणि लोकसभा मिळून) = एका खासदाराच्या मताचे मूल्य २०१७ मध्ये भारतातील सर्व राज्यांच्या आमदारांच्या मतांचे एकूण मूल्य ५,४९,४९५ इतके होते आणि खासदारांची संख्या ७७६ होती. त्यावरून वरील सूत्रानुसार, ५,४९,४९५/७७६ =७०८.११ (अपूर्णांक अर्ध्याहून कमी असल्याने तो सोडून दिला जातो.) एका खासदाराच्या मताचे मूल्य ७०८ निश्चित केले गेले. यावेळी, जम्मू-काश्मीर विधानसभा विसर्जित असल्यामुळे खासदारांच्या मतांचे मूल्यदेखील ७०८ वरून कमी होऊन ७०० झाले आहे.

मतदार

विधानसभेतील आमदार

लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार

यांना मतदानाचा अधिकार नाही

विधानपरिषदेचे सदस्य

राज्यपाल नियुक्त आमदार

राष्ट्रपती नियुक्त खासदार

शपथविधी २५ जुलैलाच

१९७७ पूर्वी काही राष्ट्रपती आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नव्हते. त्यामुळे त्यांच्यानंतर झालेल्या शपथविधी समारंभांच्या तारखा वेगळ्या आहेत. मात्र २५ जुलै १९७७ रोजी नीलम संजीव रेड्डी यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. त्यांच्यासह त्या नंतर झालेल्या सर्व राष्ट्रपतींनी आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे त्यामुळे १९७७ नंतर झालेल्या सर्व राष्ट्रपतींचे शपथविधी २५ जुलैलाच झाले आहेत.

मतदान कुठे होते?

आमदार : संबंधित राज्याच्या विधानभवनात

खासदार : संसद भवन

मतदारांची संख्या

५४३ - लोकसभेतील खासदार

२३३ - राज्यसभेतील खासदार

४०३३ - सर्व आमदार

४८०९ - एकूण मते

मतांचे एकूण मूल्य : १०,८६,४३१

निवडक राज्यांतील आमदारांच्या मतांचे मूल्य

उत्तर प्रदेश २०८ महाराष्ट्र १७५

केरळ १५२ मध्य प्रदेश १३१

कर्नाटक १३१ पंजाब ११६

बिहार १७३ गुजरात १४७

झारखंड १७६ ओडिसा १४९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT