know what is omicron variant of coronavirus and where did name came from  Sakal
देश

कोरोना व्हेरिएंटचं नाव 'ओमिक्रॉन' कसं पडलं? जाणून घ्या सर्वकाही

सकाळ डिजिटल टीम

कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटमुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली आहे. कोरोनाच्या उद्रेकानंतर जवळपास दोन वर्षे उलटून गेल्यानंतर जग त्याच्या नव्या रूपांशी झुंजताना दिसत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या समितीने कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटला 'ओमिक्रॉन' असे नाव दिले आहे. तसेच हा व्हेरिएंट अत्यंत संसर्गजन्य असल्याचे सांगीतले आहे. यापूर्वी कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट समोर आला होता, ज्यामुळे युरोप आणि अमेरिकेतील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या व्हेरिएंटवर लस किती प्रभावी आहे याचा अंदाज लावणेही सध्या कठीण आहे.

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट समोर आल्यानंतर त्याचा प्रसार रोखण्यासाठी जगातील विविध देश दक्षिण आफ्रिकी देशातून प्रवास करण्यावर निर्बंध लादत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, इराण, जपान, थायलंड, अमेरिका, युरोपियन युनियन देश आणि ब्रिटन यांच्यासह अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकन देशांमधून प्रवासावर निर्बंध लादले आहेत. विमानसेवा बंद झाल्यानंतरही हा व्हेरिएंट पसरत असल्याचे समोर आले आहे. बेल्जियम, इस्रायल आणि हाँगकाँगमधील प्रवाशांमध्ये हा व्हेरिएंट आढळला आहे गेली आहेत.

WHO ने अद्याप Omicron किती धोकादायक आहे हे अद्याप समजले नसल्याचे सांगीतले आहे, या व्हेरिएंटची लागण होण्याचा धोका इतर व्हेरियंटपेक्षा जास्त आहे , म्हणजेच ज्या लोकांना COVID-19 ची लागण झाली आहे आणि ते त्यातून बरे झाले आहेत त्यांना पुन्हा संसर्ग होऊ शकतो. सध्याच्या लसी या नवीन व्हेरिएंट विरोधात प्रभावी आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी काही आठवड्यांचा काळ लागेल.

काय आहे हा नवीन व्हेरिएंट

नवीन प्रकाराचे औपचारिक नाव B.1.1.529 आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेस (NICD) ने आतापर्यंत 22 केसेस सापडल्याचे स्पष्ट केलं आहे. हे सर्व दक्षिण आफ्रिकेत सापडले. या व्हेरिएंटचे अनेक म्युटेशन आहेत आणि ते व्हायरसच्या काम करण्याच्या पध्दतीत मोठे बदल घडवून आणू शकतात. संस्थेने असेही म्हटले आहे की जीनोमिक विश्लेषण चालू आहे आणि आणखी प्रकरणे समोर येऊ शकतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या कोविड-19 तांत्रिक टीमच्या प्रमुख मारिया व्हॅन कारखोव्ह यांनी सांगितले की, हा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळला आणि सध्या 100 पेक्षा कमी संपूर्ण जीनोम सिक्वेंस उपलब्ध आहेत.

ओमिक्रॉन हे नाव कसं पडलं?

WHO ग्रीक वर्णमालेतील अक्षरानुसार नवीन व्हेरिएंटला नावे दिली जातात. ओमिक्रॉन हा ग्रीक वर्णमालेतील 15 वे अक्षर आहे. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे WHO ने व्हेरिएंटला वर्णमालेत याच्या आधी असलेले 2 अक्षरं नाव म्हणून देणे टाळले आहे. हे दोन्ही वगळलेले शब्द Nu आणि Xi असे आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नावाशी साधर्म्य असल्याने Xi हा शब्द वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्याच वेळी, न्यू म्हणजे नवीन असा उच्चार होत असल्याने Nu हे अक्षर वगळण्यात आले आहे.

ओमीक्रॉन वर वॅक्सिन मिळेल का?

ओमिक्रॉन व्हेरिएंट गेल्या चार दिवसांत 8 देशांमध्ये पोहोचला आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका, इस्रायल, इटली, हाँगकाँग, बोत्सवाना, बेल्जियम, जर्मनी, झेक प्रजासत्ताक आणि ब्रिटन यांचा समावेश आहे. ओमीक्रोनवरील लस AstraZeneca, Moderna, Novavax आणि Pfizer यासह अनेक औषध कंपन्यांनी सांगितले की, Omicron समोर आल्यानंतर पुन्हा डिझाइनशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्याकडे लस बनवण्याचा प्लॅन रेडी आहे. फायझरने असेही म्हटले आहे की ओमिक्रॉनवर त्याची लस किती प्रभावी ठरेल हे सांगता येणार नाही. त्याच वेळी, ऑक्सफर्ड लस समूहाचे संचालक प्रोफेसर अँड्र्यू पोलार्ड यांनी आशा व्यक्त केली की सध्याच्या लसी ओमिक्रॉन फॉर्ममुळे होणारे गंभीर आजार रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. ऑक्सफर्ड व्हॅक्सिन ग्रुपने अॅस्ट्राझेनेका लस विकसित केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Pune: 'आर्टी'च्यावतीने शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

SCROLL FOR NEXT