देश

कर्नाटक सीमेवरून महाराष्ट्राच्या 13 बसेस फिरल्या माघारी

कोगनोळी नाक्यावर कडक बंदोबस्त : आरटीपीसीआरसह दोन डोसची सक्ती

अनिल पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी : येथे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कोगनोळी (Kognoli Check Post)कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरुन आरटीपीसीआर रिपोर्ट (RTPCR Test ) व कोरोना प्रतिबंधक दोन डोस नसल्याच्या कारणावरून मंगळवारी (ता. 2) रात्री 13 खासगी बसेस परत महाराष्ट्रात पाठवल्या. निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार (Anil Kumbhar) यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रात (Maharastra) कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक (Karnatka) नाक्यावर कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. या ठिकाणी महाराष्ट्र व इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांचा आरटीपीसीआर रिपोर्ट व कोरोना प्रतिबंधक डोस घेतल्याचे प्रमाणपत्र तपासणी करूनच त्यांना कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे.

मुंबई, पुणे, कोल्हापूर (Mumbai,Pune,Kolhapur)या ठिकाणांहून कर्नाटकात जात असलेल्या खासगी बसेसची तपासणी या ठिकाणी करण्यात आली. या बसमध्ये प्रवाशांचे आरटीपीसीआर रिपोर्ट व डोस घेतल्याचे प्रमाणपत्र नसल्याने बसेस परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात आल्या आहेत.

कोगनोळी येथील दूधगंगा नदीवर कर्नाटक सीमा तपासणी नाका गेल्या दोन वर्षभरापासून सुरू आहे. याठिकाणी गेल्या महिनाभरात काही प्रमाणात प्रवाशांना सूट देण्यात आली होती. पण महाराष्ट्रातील मुंबई व इतर ठिकाणी वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, कोगनोळी पोलिस चौकीचे सहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. टोलगी, राजू गोरखनावर यांच्यासह आरोग्य विभाग व पोलिस विभाग यांच्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT