Mithun Chakraborty esakal
देश

सत्ताधारी पक्षाचे 38 आमदार भाजपच्या संपर्कात; मिथुनच्या दाव्यानंतर टीएमसीचं प्रत्युत्तर

अभिनेता ते राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांनी एक मोठा दावा केलाय.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता ते राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांनी एक मोठा दावा केलाय.

West Bengal : भाजप नेते (BJP) आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी सत्ताधारी पक्षाचे 38 आमदार पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा केल्यानंतर टीएमसीनं मिथुन यांना प्रत्युत्तर दिलंय. टीएमसीचे (TMC) राज्यसभा सदस्य शंतनू सेन यांनी मिथुन मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं म्हटलंय.

ते म्हणाले, मी ऐकलं आहे की मिथुन चक्रवर्ती यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मला वाटतं की, ते शारीरिक नव्हे तर मानसिकदृष्ट्या आजारी आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचं राजकारण कळत नाही, अशी टीका त्यांनी केलीय. त्याच वेळी टीएमसीचे आणखी एक राज्यसभा सदस्य डोला सेन यांनी देखील मिथुन चक्रवर्ती हे प्रसिद्ध अभिनेते आहेत, अशी खिल्ली उडवलीय. 'अभिनेते आणि कलाकारांना स्वप्न कसं पहावं हे माहित आहे. आपण सामान्य लोक आहोत. आपल्याकडं इतकी वैविध्यपूर्ण स्वप्नं नाहीत. मिथुनला त्याच्या सर्व स्वप्नांसाठी शुभेच्छाही दिल्या.'

अभिनेता ते राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांनी बुधवारी मोठा दावा केला. ते म्हणाले, टीएमसीचे 38 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. मी स्वतः 21 आमदारांशी चर्चा करत असल्याचा दावा त्यांनी केलाय. बुधवारी कोलकाता येथील भाजप पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मिथुन यांनी हा दावा केलाय. ते पत्रकारांना म्हणाले की, तुम्हाला ब्रेकिंग न्यूज जाणून घ्यायची आहे का? माझ्याकडं टीएमसीचे 38 आमदार आमच्या संपर्कात असल्याची ब्रेकिंग न्यूज आहे. भाजपला मुस्लिमविरोधी म्हणणं हे एक षडयंत्र असल्याचंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT